Posts

खास तुमच्यासाठी....

                          ३ जून २०१५  माझ्यासाठी एक खास दिवस कारण त्यादिवशी, खरंतर रात्री  मी माझी अनुदिनी लिहायला सुरुवात केली. माझ्यासाठी हा एक प्रयोग होता, कारण लिहिता येणं वेगळं आणि सातत्याने लिहित राहणं वेगळं. मला लिहिता येत होतं पण तेच सातत्याने जमेल का हे पडताळून पाहण्यासाठी ही अनुदिनी होती खरंतर. आणि वर्ष होऊन गेलंय या गोष्टीला पण आता मी म्हणू शकते की हो मला लिहिताही येतंय आणि सातत्यानेही लिहिता येतंय.                          शब्दरांजण एक वर्षाचं झालंय. पण शब्दारांजणाचा प्रवास सुरु झाला त्याच्या नावापासून, बरचं डोकं खाजवत होते मी की नाव काय असावं अनुदिनीचं आणि माझ्यासोबत अजून  एक व्यक्ती ह्याचा माझ्याच इतका खोलवर विचार करत होती, ती व्यक्ती म्हणजे 'प्रणव सुर्वे' . आज "शब्दरांजण" इतक्या थाटात शब्दरांजण म्हणून मिरवतंय ते ...

पाऊस आला, वारा आला...

            नमस्कार मंडळी ! कसं काय ? बरं चाललंय ना सगळ्यांचं ? आज पोस्टसाठी वेगळंच काहीतरी लिहायचं ठरवलं होतं, पण सकाळी अचानक आलेल्या पावसाने सगळा मूडच बदलून टाकला माझा.. मग म्हटलं इतर सगळं नंतर लिहू आधी लिहायचं आजच्या सुंदर सकाळबद्दल .        आज सकाळी जेव्हा पाऊस कोसळत होता तेव्हा खरंतर मी गाढ झोपले होते, मैत्रिणी आल्याही होत्या उठवायला पण आपल्या मुलीला इतकं सुखी झोपलेलं पाहून आईला काय मला उठवावंस वाटलं नाही. थोडासा राग आला मला तिचा पण म्हटलं जाऊ देत त्यानिमित्ताने झोपायला मिळालं. तर मला जाग आली ब्राउनीच्या भुंकण्याने, खिडकीबाहेर पाहिलं तर मस्त पाऊस पडत होता, इतकं छान, फ्रेश वाटलं की मी ब्रशही न करता तशीच गच्चीवर पळाले. तुम्ही पावसाळ्यात कुठेही भिजायला जा, मरीन ड्राईव्ह, वरळी सी-फेस, दादर चौपाटी अगदी कुठेही पण जिथे तुम्ही लहानपणी खेळलात, वेड्यासारखे गाणी म्हणत नाचलात, ‘ये रे ये रे पावसा’ म्हणत पावसाला साद घातलीत त्याच ठिकाणी, त्याच मित्रमैत्रिणींबरोबर पहिल्या पावसात भिजण्याची मजा काही औरच अस...

प्रेमझुला..

ती सुंदर रात्र. त्या रात्रीत आवेग होता प्रेमाचा, स्पर्शाचा, उन्मादाचा.. त्या रात्री शब्द नव्हते , आपली शरीरं संवादत होती, ती रात्रच काही वेगळी होती.. अगदी अलगद ती उलगडत होती, तुझे डोळेच सगळं बोलत होते, माझ्या हृदयाचे ठोके वाऱ्याच्या वेगाने धावत होते, तुझ्या नजरेने मी कोमेजत होते, कणखर अशा तुझ्या बाहुपाशात मी विसावत होते, माझ्या ओठांची प्रत्येक हालचाल तुझे डोळे टिपत होते, शेवटी सावज पकडावं तसं तुझ्या ओठांनी त्यावर नेम धरला, आणि सुरु झालं एक द्वंद्व, तुझ्या माझ्या ओठांचं, त्यावरल्या प्रत्येक गुंत्याचं.. तुझा आवेग मग वाढत गेला, आणि मी घायाळ होत गेले, तुझ्या नजरेने लाजलाजरी झाले, मीही मग तुझ्यामाझ्या प्रेमाच्या झुल्यावर झुलू लागले, संथ , शांत, लयीत.. तू फार खोलवर स्पर्शून गेला होतास, तुझ्या उष्ण श्वासात, तुझ्या थरथरणाऱ्या शरीरात, तुझ्या बळकट पकडीत, मी न्हाऊन निघत होते, ओठांचं द्वंद्व अजूनही सुरूच होतं... झुल्याचा वेग मग वाढू लागला , मीही सुखाने हिंदकळत होते, आपले उसासे लयबद्ध ताल धरत होते.. झुल्याने अगदी उंच झोका घेतला, आणि आपण दोघंही कोसळलो, एकमे...

मी लिहायला हवं होतं..

मी फार आधीच लिहायला हवं होतं, तुझ्या नितळ, गोऱ्या कांतीबद्दल, तुझ्या खोल निळ्याशार डोळ्यांबद्दल, त्यातल्या प्रत्येक सुंदर भावाबद्दल, मी आधीच लिहायला हवं होतं.. तुझ्या इवल्याश्या नाकाबद्दल, तुझ्या नाजूक हनुवटीबद्दल, त्यावरल्या काळ्या तीळाबद्दल, मी आधीच लिहायला हवं होतं.. तुझ्या चेहऱ्यातल्या प्रत्येक बदलाबद्दल, तुझ्या फुलागत कोमल ओठांबद्दल, त्यांच्या प्रत्येक चुंबनाबद्दल, मी आधीच लिहायला हवं होतं.. तुझ्या सुरेख मनगटाबद्दल, तुझ्या मऊशार तळहाताबद्दल, त्यावरच्या गुंतलेल्या प्रत्येक रेघेबद्दल, मी आधीच लिहायला हवं होतं.. तुझ्या नाजूक शरीरयष्टीबद्दल, तुझ्या शरीराच्या कमनीयतेबद्दल, त्यातल्या ओळखी, अनोळखी वाटांबद्दल, मी आधीच लिहायला हवं होतं.. तुझ्या हृदयातल्या प्रत्येक ठोक्याबद्दल, तुझ्या ठोक्यातल्या संथ लयीबद्दल, त्यातल्या जीवघेण्या भीतीबद्दल, मी आधीच लिहायला हवं होतं... तुझ्या अल्लड खट्याळपणाबद्दल, तुझ्या हट्टी स्वभावाबद्दल, त्यातल्या अहंकाराबद्दल, मी फार आधीच लिहायला हवं होतं.. तुझ्या स्वर्गीय मिठीबद्दल, तुझ्या उष्ण श्वासांबद्दल, त्यातल्या गंधाळलेल्या स...

आत्महत्या....

त्या पडक्या घरात तो एकटाच राहत होता, दिवसभर एकाच कोपऱ्यात पडलेला आणि रात्र कशी घालवायची ह्या विचारात असलेला. दिवसा मग तो बऱ्याच ठिकाणी जाऊन यायचा, बसल्या बसल्या हृदयाच्या तळाशी जायचा, डोक्याच्या आतल्या पेशींवर झोके घ्यायचा, नाहीतर मनाच्या खूप आत जाऊन निपचित पडायचा. काही दिवस त्याला उत्साह वाटायचा, उरलेले दिवस कंटाळवाणे जायचे. त्याला वाटायचं मग की माझीही दखल घ्यायला हवी कोणीतरी, माझंही अस्तित्व आहे या जगात, दाखवायला हवं कोणीतरी. मात्र बरेच दिवस झाले त्याच्याकडे कोणी लक्षचं दिलं नाही, त्या घराच्या मालकानेसुद्धा नाही. बाहेर पडण्याचा नाहक प्रयत्न तो रोज करायचा, आज तरी आपण बाहेर पडू या विचारावर दिवस रेटायचा. वैतागला होता तो त्या गंजलेल्या डोक्याला, संतापला होता या निरर्थक आयुष्याला, त्याचे श्वासही त्याला जड वाटायचे, जगण्याचे प्रयत्न निष्फळ वाटायचे. अखेर तो कंटाळला, मनापासून थकला, आणि आज त्याच्या अनेक विचारांपैकी एका विचाराने आत्महत्या केली....