Posts

"प्लीज, मला मदत कराल ?"

मी स्वतःलाच गोळा करत चाललोय, चिंधड्या-चिंधड्यांतून, तुकड्या-तुकड्यांतून, आणि तळागाळातून.... आधी मी पूर्ण होतो, दोन हात, दोन पाय, एक हृदय, टकलावर चार केस, मी पूर्ण होतो... मध्येच रस्त्यावर एक मुलगी दिसली, हात नसलेली. तिला हात दिले. एका पुरुषाला, माझे पाय... माझ्याही नकळत मी सगळं देत गेलो, जीवावर उदार होऊन. मी तर हृदयही दिलं, एक-दोनदा नाही तर पाच वेळा, त्याचेही आता तुकडे झालेत, प्रत्येकीने वेगवेगळ्या आकारात, वेगवेगळ्या हत्याराने ते तोडलंय.. काही भाग तर चक्क हरवलेत कुठल्यातरी खोल डोहात, काळ्यामिट्ट अंधारात. कुठेही शोधून सापडेनासे झालेत  माझे अवयव.. "प्लीज, मला मदत कराल ? एकच मदत कराल?" "मी जशी सगळ्यांना मदत करत गेलो, माझे अवयव देत गेलो, तसं तुम्ही कराल?" "शरीरात रक्तही नसलेल्या या कफल्लकाला पूर्णत्व द्याल ?" "मला गरज आहे हो त्या पूर्णत्वाची, खूप गरज आहे, प्लीज मला मदत कराल?" "काही नाही तर फक्त माझं पिळवटलं गेलेलं हृदय, पिचलं गेलेलं मन, प्लीज ते तरी एकत्र करून द्याल? हवं तर शिवून द्या, मला ना, ...

त्याला आवडायचं...

ओंजळीत तिच्या केवड्याची फुलं होती,             त्याला केवडा फार आवडायचा. पावसात ती नखशिखांत भिजत होती,             त्याला पाऊस फार आवडायचा. दूरवर पसरलेला समुद्र ती न्याहाळत होती,             त्याला समुद्र फार आवडायचा. विमानांची ये-जा ती पाहत होती,             त्याला विमान फार आवडायचं. मऊसूत वाळूत ती फिरत होती,             त्याला वाळू फार आवडायची. पुस्तकांची पानं ती आवडीने वाचत होती,             त्याला पुस्तकं फार आवडायची. वाफाळत्या कॉफीचा घोट ती घेत होती,             त्याला कॉफी फार आवडायची. पडत झडत ती सायकल चालवत होती,             त्याला...

भाषा आणि तिचं (निराशाजनक) भविष्य?

          आत्ता अगदी थोड्याच वेळापूर्वी मी भाषा आणि त्याचं भविष्य या विषयावर एक संदेश (मेसेज) पाठवला होता, त्याच विषयावर थोडं सविस्तर बोलण्यासाठी ही आजची पोस्ट.त्याआधी विषय नक्की काय आहे हे थोडक्यात : भाषा, त्याचं भविष्य आणि विशेषतः मराठी. "मिळणं" आणि "भेटणं" या क्रियापदांमध्ये होणारी गफलत. तर, जेव्हा आपण एखादी भाषा शिकतो तेव्हा त्यातले शब्द, त्यांचा अर्थ आणि ते शब्द जिथे वापरले जातात त्यांचे संदर्भ हे सगळं शिकत असतो. बऱ्याचदा असं होतं की ह्या सगळ्यांची सांगड ही त्या त्या भाषिकानुसार बदलते. म्हणजे असं की, मराठी ही फक्त एकच नाहीये तर ती बऱ्याच छोटया छोटया अनेक मराठींची बनलेली आहे. मग ती पुण्याकडची मराठी असो, विदर्भातली असो किंवा खानदेशातली ह्या प्रत्येक प्रांतानुसार भाषा बदलते, जिला भाषाविज्ञानात Variation म्हणतात.  आता तुम्ही वास्तविकता डोळ्यासमोर ठेवा आणि बघा की गोष्टी कशा आणि कुठे बदलतात. प्रत्येक शहरात आणि गावात भागाभागांप्रमाणे भाषा बदलते, ह्या वाडीत एखाद्या शब्दाचा अर्थ क्ष असतो तर लगेच पुढच्या वाडीत त्याच शब्दाचा अर्थ य होतो....

प्राजक्त...

तुझ्या ओंजळीतला प्राजक्त कधी बहरलाच नाही. मी वाट पाहत होते त्याच्या चैतन्याची, त्याच्या मनमुराद हसण्याची, लाजत मुरडत डोलण्याची, पण तसं झालंच नाही . तुझ्या ओंजळीतला प्राजक्त कधी बहरलाच नाही. त्याला बहुदा फुलणं आवडत नसावं, कारण कलाकार माणूस तू तुझ्याकडे सगळेच फुलतात, आपली क्षितिजं खुलवतात. प्राजक्त फुलायला हवा होता, पण तसं झालंच नाही. तुझ्या ओंजळीतला प्राजक्त कधी बहरलाच नाही. मला हवा होता तो बहरलेला प्राजक्त मनभरून सुगंध घेतला असता मी त्याचा, माझ्या ओंजळीत घेऊन त्याला स्पर्श केला असता, पण तसं झालंच नाही. तुझ्या ओंजळीतला प्राजक्त कधी बहरलाच नाही. प्राजक्त तसाच राहिला कोषात, बंदिस्त.. निष्क्रिय... फक्त तुझ्या ओंजळीच्या सावलीत, अस्तित्वहीन... ओळख नसलेला प्राजक्त....  त्याने बहरायला हवं होतं ना ? फुलायला हवं होतं, बागडायला हवं होतं, तुझ्या ओंजळीत नाचायला हवं होतं, पण तसं झालंच नाही. तुझ्या ओंजळीने, तुझ्या ओंजळीने प्राजक्ताला बहरुच दिलं नाही... का ?

शब्द, शब्द आणि शब्द ...

                     शब्द,                      कसे  सुचतात शब्द ?                      खरंतर आजवर मीही ह्यावर विचार केला नव्हता की खरंच मला कसे सुचत्तात शब्द ? ते बाहेरच्या जगात असतात ? की माझ्याच आत, मनात, खोलवर कुठेतरी दडलेले असतात ? उत्तर मी अजूनही शोधतेय, कारण होतं काय की सुचणं ही एक प्रक्रिया आहे पण ती वैज्ञानिक प्रक्रिया नाही. ती एक कला आहे आणि कलेशी निगडीत प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या चौकटीत बसवता येत नाही, जरी आलीच बसवता तरी कलासक्त माणसांना ती पटतेच असं नाही.                      माझंही अगदी तसंच झालंय , म्हणजे एकीकडे भाषाविज्ञानात मी शब्द, भाषा, ध्वनी यांच्याशी निगडीत गोष्टी शिकले पण ते सगळंच कलेच्या कक्षेत न बसणारं आ...

खास तुमच्यासाठी....

                          ३ जून २०१५  माझ्यासाठी एक खास दिवस कारण त्यादिवशी, खरंतर रात्री  मी माझी अनुदिनी लिहायला सुरुवात केली. माझ्यासाठी हा एक प्रयोग होता, कारण लिहिता येणं वेगळं आणि सातत्याने लिहित राहणं वेगळं. मला लिहिता येत होतं पण तेच सातत्याने जमेल का हे पडताळून पाहण्यासाठी ही अनुदिनी होती खरंतर. आणि वर्ष होऊन गेलंय या गोष्टीला पण आता मी म्हणू शकते की हो मला लिहिताही येतंय आणि सातत्यानेही लिहिता येतंय.                          शब्दरांजण एक वर्षाचं झालंय. पण शब्दारांजणाचा प्रवास सुरु झाला त्याच्या नावापासून, बरचं डोकं खाजवत होते मी की नाव काय असावं अनुदिनीचं आणि माझ्यासोबत अजून  एक व्यक्ती ह्याचा माझ्याच इतका खोलवर विचार करत होती, ती व्यक्ती म्हणजे 'प्रणव सुर्वे' . आज "शब्दरांजण" इतक्या थाटात शब्दरांजण म्हणून मिरवतंय ते ...

पाऊस आला, वारा आला...

            नमस्कार मंडळी ! कसं काय ? बरं चाललंय ना सगळ्यांचं ? आज पोस्टसाठी वेगळंच काहीतरी लिहायचं ठरवलं होतं, पण सकाळी अचानक आलेल्या पावसाने सगळा मूडच बदलून टाकला माझा.. मग म्हटलं इतर सगळं नंतर लिहू आधी लिहायचं आजच्या सुंदर सकाळबद्दल .        आज सकाळी जेव्हा पाऊस कोसळत होता तेव्हा खरंतर मी गाढ झोपले होते, मैत्रिणी आल्याही होत्या उठवायला पण आपल्या मुलीला इतकं सुखी झोपलेलं पाहून आईला काय मला उठवावंस वाटलं नाही. थोडासा राग आला मला तिचा पण म्हटलं जाऊ देत त्यानिमित्ताने झोपायला मिळालं. तर मला जाग आली ब्राउनीच्या भुंकण्याने, खिडकीबाहेर पाहिलं तर मस्त पाऊस पडत होता, इतकं छान, फ्रेश वाटलं की मी ब्रशही न करता तशीच गच्चीवर पळाले. तुम्ही पावसाळ्यात कुठेही भिजायला जा, मरीन ड्राईव्ह, वरळी सी-फेस, दादर चौपाटी अगदी कुठेही पण जिथे तुम्ही लहानपणी खेळलात, वेड्यासारखे गाणी म्हणत नाचलात, ‘ये रे ये रे पावसा’ म्हणत पावसाला साद घातलीत त्याच ठिकाणी, त्याच मित्रमैत्रिणींबरोबर पहिल्या पावसात भिजण्याची मजा काही औरच अस...