Posts

खेळ

वाचता वाचता अचानकच  पुस्तक बंद   मनात विचारांचं थैमान  आणि डोक्यात प्रश्नांचं काहूर,   एकमेकांत गुंतल्या व्यक्तिरेखा  संवादाचं प्रचंड जंजाळ  घटना-प्रसंग एकमेकांना  करू लागले प्रश्नोत्तरं मनात सत्य-असत्याचा कल्लोळ  हृदयाची वाढलेली धडधड  संभ्रम, गोंधळ आणि उत्तराच्या अपेक्षेत  आ वासून उभे असलेले प्रश्न  डोकं बधीर आणि  पुस्तक पुन्हा उघडलं. हे खरं ? ते खोटं ? नेमकी कशी करावी मी पडताळणी ?   काही मापदंड ?  कोणतंही तत्व ?  की सगळेच माझ्या मनाचे खेळ ? 

आभाळ

तिचं आभाळ काहीसं वेगळं थोडं खुलं, बरंच मोकळं आभाळात कधीतरी येतात ढग काळोखं, अंधारं होतं तिचं जग पण नेहमीच दिसतो एक किरण आशा, प्रेम की भाग्याचं कोंदण ? असतो पाऊस बऱ्याचदा तिच्या आभाळी  कित्येक पहिले थेंब झेललेत तिने कपाळी  आभाळात आहे इवलुसा चंद्र लुकलुकणारे बरेचसे तारेही  आभाळाच्या माथ्यावर एक सूर्यही उगवतो  तिची स्वप्नं उराशी ठेवून तो मावळतो  तिच्या आभाळाला ना आहे सीमा  ना आहे कोणतीही मर्यादा  आभाळात तिच्या आहेत ग्रहांची लेणी  त्या लेण्यांत आहेत नशिबांचे मणी कधीतरी अंगावर येतं हेच आभाळ  सोसत नाही तिला या वाऱ्याचा भार  खरंच आहे हे आभाळ ?  की आहे नुसतं जंजाळ ? शक्य आहे या खऱ्या आभाळी  तिच्या मनातलं आभाळ ?  असायचं तर असू दे  नसायचं तर नसू दे ! तिचं आभाळ आजही मोकळं ना कुठल्या खिडक्या ना दारं आभाळ असतं सतत रंगीत  आयुष्यातलं जणू सुंदर संगीत  आभाळात आहे इंद्रधनुष्य मखमाली  तीच तिची सखी आणि तीच वाली ! आजही अविरत चालतेय त...

थम जा जिंदगी

आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं ! मंगेश पाडगावकरांच्या कवितेतल्या या सुंदर ओळी. आयुष्याबद्दलची एक संपूर्ण कविता. पण आयुष्य ? आयुष्य म्हणजे ? तुमच्या दृष्टीने आयुष्य म्हणजे काय ? खूप कष्ट, खूप आराम की नुसतं आला दिवस काढणं ? नाही, आयुष्य म्हणजे आलेला प्रत्येक क्षण रसरसून जगणं, ना कालचा विचार ना उद्याची चिंता, आयुष्य म्हणजे “आज” जगणं, उद्या काय घडणार, आपण कसे असू हे काहीच माहीत नसतं कारण उद्या कोणीच पाहिलेला नसतो. मुंबईकरांना २२ मार्चला कर्फ्यू लागला आणि २४ मार्चपासून असंच काहीसं घडलं, २१ दिवसांसाठी आपलं आयुष्य जणू थांबून गेलं. २१ दिवस घराबाहेर पडता येणार नाही कारण मुंबई लॉकडाऊन करण्यात आली. ती मुंबई जी कितीही रात्र असली तरी झोपत नाही, ती मुंबई जी सगळ्यांना सामावून घेते, ती मुंबई जिची लाईफलाईन असलेली ट्रेन पावसाळ्यातच बंद होते ती मुंबई थांबली. नोकरवर्गाला वर्क फ्रॉम होम मिळालं, विद्यार्थ्यांना परीक्षेआधीच सुट्ट्या मिळाल्या, काहींचे आलेले पाहुणे एकवीस दिवस अडकून पडले तर काहींना हवा असलेला एकांत मिळाला. आता तर लॉकडाऊन अजून व...

पधारो म्हारे देस (भाग २)

Image
चित्तोडगढ ६९१.९ एकरवर (सौज. विकिपीडिया) पसरलेला भव्य गड आहे.  रिक्षाने जाताना प्रत्येक दरवाज्यातून प्रवेश करत आम्ही सगळ्यात पहिले गेलो ते राणा कुंभ पॅलेसमध्ये, तो जेवढा विस्तीर्ण आहे त्यावरून त्या काळाची आपण फक्त कल्पना करू शकतो कारण तिथे केवळ पडझड झालेल्या, आगीमुळे काळसर डाग पडलेल्या भिंती आहेत. पण या पडझडीतही इतकं सौंदर्य आहे की, त्या काळी हा गड काय असेल आणि किती सुंदर असेल याची मला कल्पनाही करवत नव्हती. फक्त एका राणीच्या हव्यासापोटी कोणालाही एवढ्या सुंदर गडावर हल्ला करून त्या सगळ्या किल्ल्याची नासधूस करून आग लावावीशी कशी वाटली असेल ? पण असो, तिथे एक वेगळाच रिक्तपणा होता, अप्रतिम फ्रेम्स होत्या. एका बाजूला मीरा पॅलेस होता जिथून थेट मीरेचं मंदीर दिसतं. हळूहळू आम्ही अशा एका ठिकाणी आलो जिथे खाली भुयारात जाणाऱ्या पायऱ्या दिसत होत्या. आमच्या रिक्षाचालक / गाईडला विचारलं तर म्हणाला इथूनच राणी पद्मिनी आणि तिच्या दास्या जौहारसाठी (सती जाणं) गेल्या होत्या, ऐकल्याक्षणी अंगावर सरर्कन काटा आला. आम्ही खाली जाऊन पहायचं ठरवलं, कशीतरी हिंमत करत मी चार पायऱ्या उतरले, खाली पूर्ण काळोख होत...

पधारो म्हारे देस (भाग १)

Image
असं म्हणतात की, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची खात्री नसते, एखाद्या गोष्टीबद्दल काय करायचं हे कळत नसतं तेव्हा प्रवास करावा. प्रवास करून आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात असं नाही पण आपल्या सुखदायक राहणीमानातून बाहेर पडून परक्या ठिकाणी, अनोळखी लोकांसोबत प्रवास केल्यावर आपण या प्रचंड विश्वातली अगदी मुंगीइतकी जागा व्यापतो हे आपलं आपल्याला कळतं. नवीन ठिकाणी गेल्यावर आपल्याला सगळ्या पद्धतीने जागरूक असावं लागतं, वेळप्रसंगानुसार निर्णय घ्यावे लागतात. या सगळ्या प्रक्रियांमधून जाऊन जेव्हा आपण एखादं नवीन शहर, नवीन ठिकाण बघतो ती भावनाच वेगळी असते. प्रवास आपल्याला बदलून टाकतो, नक्की काय हे सांगता नाही, असं काहीतरी असतं जे बदलून जातं, आपण किती क्षुल्लक आहोत याची जाणीव होते. मला इतिहास हा विषय, पुरातन लिप्या, राजवाडे आणि हवेल्या, म्हणजे इतिहासाशी संबंधित सगळ्याच गोष्टी आवडतात, त्यांचं मला एक वेगळंच अप्रूप आहे. गेली कित्येक वर्षं मला राजस्थानला जायची इच्छा होती, एकदातर अगदी प्लॅन ठरता ठरता रद्द झाला. अखेर यावर्षी योग आला आणि मी माझ्या जिवलग मैत्रिणीसोबत निघाले. आम्हा दोघींची ९ रात्री १०...

ब्लॅक कॉफी आणि गुलाबाचं फूल

विचारांच्या नादात आज ब्लॅक कॉफी, थोडी जास्तच ब्लॅक झाली  आधीच कडवट लागणारी ती, आज अजूनच कडवट लागली  खिडकीच्या थंड पडलेल्या कडाप्प्यावर मी हळूच जाऊन बसले बाहेरचं विस्तीर्ण आभाळ माझ्या डोळ्यांच्या आभाळातून निरखू लागले बाहेर बघता बघता नजर गेली गुलाबाकडे  एरवी असतं भरलेलं आज मात्र एकच फूल त्याच्याकडे  त्या फुलाचा रंगही गडदसा, फुलाच्या नाममात्र पाकळ्या राहिलेल्या  तरीही फूल आकर्षक, गंधही थोडासा मधाळलेला त्या फुलाची एक पाकळी अलगद मातीत पडली  त्यावरून एक आठवण अचानक ताजी झाली  दिवस होते कॉलेजचे आणि होता एक कार्यक्रम  तोही होता सोबत माझ्या, होते त्यालाही निमंत्रण  स्वयंसेवक असूनही स्वागत झाले गुलाबाच्या फुलाने  त्यालाही दिले फूल त्या फुलं देणाऱ्या मुलीने  नाही आवडत तोडलेली फुलं मला  होती बहुधा ही कल्पना त्याला  तरीही घेतलं फूल दोघांनीही  जागा नव्हती पण फूल ठेवायला  "जागा नाहीये जुईली, फूल तुझ्याकडे ठेव" म्हणाला तो काही वर्षांपूर्वी आणि मी अजूनही जपलीये ...

रफ वही

        १३ - १४ जून, मे महिन्याच्या सुट्टीनंतरचा शाळेचा पहिला दिवस. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जून उजाडताच दादर गर्दीने तुडुंब भरलेलं असायचं. दप्तरं, वह्या-पुस्तकं, कव्हरं, युनिफॉर्म, पाण्याच्या बाटल्या, डब्ब्याच्या बॅगा हे सगळं घेण्यासाठी पालक आणि मुलांची गर्दीच गर्दी.            त्यावेळी मुलांच्या आवडीच्या सगळ्या वस्तू घेतल्या जायच्या, काहींना त्यांच्या आवडीच्या वस्तू मिळायच्या नाहीत, पण कसंही का होईना सगळ्या वस्तू घेऊन घरी जायचं, आणि मग सुरू व्हायची खरी उत्सुकता. वस्तू कधी काढल्या जातायत, कधी एकदा शेजारच्या मित्रमैत्रिणींना दाखवल्या जातायत, वह्या पुस्तकांना कव्हरं घातली जातायत आणि कधी एकदा दप्तर भरलं जातंय. मी मुद्दामहून वह्यांना चॉकलेटी तर पुस्तकांना पारदर्शक कव्हरं घालायचे, कारण पुस्तकांच्या मुखपृष्ठावर छान छान चित्रं असायची. तेव्हा स्टेशनरीसाठी कॅमलिन, नवनीत हे फेमस ब्रँड्स होते, कॅमलिनच्या पानं, फुलं, देखावे असणाऱ्या वह्या मिळायच्या, आणि त्यांना कव्हर घालणं अगदी जीवावर यायचं, पण नियम ते नियम, घालावं लागायचं. लहान असत...