Posts

Showing posts from August 9, 2015

प्रेम....

प्रत्येक प्रेमाची नवीच भाषा, मौनातले संवाद आणि स्पर्शाची परिभाषा, त्याची-तिची मैत्री त्यावर प्रेमाची नक्षी, वादाच्या आभाळात तिच्या रुसव्याचा पक्षी, मैत्रीच्या परिघातला तो स्पर्श नकळत वाढलेली त्याची आपुलकी, व्यक्त केलेल्या प्रेमावर मग तिच्या होकाराची गुलबक्षी, प्रेमाचे ते गुलाबी दिवस सप्तरंगी सारं जग, तिच्यासाठी महत्वाचा त्याच्या प्रेमाचा संग, हातातला तिचा हात म्हणजे त्याचं आयुष्य, त्याच्या मिठीत तिचं सारं विश्व, सुखाच्या हिंदोळ्यावर झुलणारे दोन जीव, वास्तवातली दोन शरीरं पण तरीही एकाच अस्तित्वाची जाणीव, त्याचं-तिचं प्रेम जणू एक पुस्तक, ज्याला सुरुवात तर आहे पण ठाऊक नाही शेवट, त्याचं-तिचं प्रेम कॉफी वाफाळलेली, अतीव प्रेमाच्या दुनियेत दोघंही हरवलेली, त्याचं-तिचं प्रेम कोसळणाऱ्या धारा, सप्तरंगी धनुष्यासोबत स्पर्शाचा शहारा, त्याचं-तिचं प्रेम जणू अथांग सागरकिनारा, पायाला जाणवणारी वाळू आणि बेभान वाहणारा वारा, त्याचं-तिचं प्रेम उंचावरचा धबधबा, फेसाळलेलं पाणी आणि भीतीचा आवाज गहिरा, प्रेमाच्या लाटा उत्साहाला भरती, त्यांच्या प्रेमाची प्रत...