ज्ञानसूर्य अस्ताला गेला, पण पुन्हा उगवण्यासाठी...
एकादशीची संध्याकाळ होती, आठ वाजले होते.. पडल्यापडल्या माझा डोळा लागलेला, उठले तर ६४ मेसेज होते, कळेना नक्की झालंय काय.. मेसेज उघडून पाहिला तर धक्काच बसला, आणि माझ्याही नकळत मी रडायला लागले, बातमी होती, " डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम अनंतात विलीन झाले. " डॉ. अब्दुल कलाम, एक अजस्त्र व्यक्तिमत्व, अत्यंत हुशार पण तितकेच साधे, म्हणजे आकाशात भरारी घेत असतानाही जमिनीवर कसं राहावं हे त्यांच्याकडून शिकावं इतका तो माणूस विनयशील होता. स्वतःच्या ज्ञानाचा गर्व नाही, पुरस्कारांचं अप्रूप नाही, जगजाहीर असलेल्या नावाचंही काही नाही, अगदी ऋषितुल्य माणूस, पण प्रेम, श्वास आणि ध्यास एकंच ' भारत देश आणि त्याचा विकास ' त्यांनी लग्न केलं नाही, का ? तर त्यांना फक्त स्वतःच्याच नाही तर भारतातल्या प्रत्येक मुलाला, ज्याला शिक्षण मिळत नाही अशा प्रत्येक मुलाला शिकवायचं होतं, किती निस्वार्थी असावं कलाम सरांनी ! एक सच्चा शिक्षक, कल्पक संशोधक, प्रेमळ माणूस आणि लोकांचा राष्ट्रपती म्हणजे कलाम सर. भारतात असं आहे ना, की तुमची जात आणि धर्म प्रत्येक पावली पाहिला जातो, पण कलाम सर ही पहिली व्यक्त...