भर दुपारी..
निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी मी एकटाच बसलो होतो. ना मला कोणाची काळजी होती, ना कोणाला माझी . माझा माझा मस्त आराम चालला होता.टळटळीत ऊन पडलं होतं. आसपास कोणत्याच अस्तित्वाची जाणीव नव्हती, सगळी जीवसृष्टी जणू रजेवर गेली होती आणि मी एकटाच बाहेर पडलो होतो भटकायला. विश्रांतीचं ठिकाण होतं निष्पर्ण वृक्ष , भुंडं झाड. बराच वेळ मी ह्या फांदीवरुन त्या फांदीवर फिरलो, झोके घेतले छोट्याश्या डहाळीवर. नंतर मात्र भूक लागली. म्हटलं चला काहीतरी खाऊया, मग लक्षात आलं, की अरे, झाड तर भुंडं ! ना पानं येण्याची आशा ना भविष्याची ओढ. मनात आलं, काय आहे या भुंड्या झाडाचं अस्तित्व ? कशाच्याच उपयोगाचं नाही ते, ना सावलीसाठी ना अन्नासाठी आणि ना निवाऱ्यासाठी. फक्त उपयोग होईल तो सरपणाला, पण म्हणजे भविष्य चुलीत जाणार.. आणि त्यात भर म्हणजे आहे एक झाड, त्यामुळे कुठे हिंड...