Posts

Showing posts from August 23, 2015

अबोल रात्रीतली प्रत्येक शांतता आज बोलली...

अबोल रात्रीतली प्रत्येक शांतता आज बोलली आजवर जपलेल्या शरीरावरची जखम अखेर आज उघडी पडली, शरीर तिचं, मन तिचं, पण अधिकार त्याचा, का होतं हे असं? तिनेही खूप विचार केला ह्यावर, पण तोवर शरीराची बरीच चिरफाड झाली होती, तिच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचा लचका तुटलेला तिने पाहिला होता , इतरांना ते दिसलं नाही, मात्र मनावरचे आघात तिचे तिलाच कळले, रोज रात्री तो यायचा, तिच्या इच्छेविरुद्ध सगळ्या गोष्टी व्हायच्या, कपड्यांसोबत अब्रूचीही मग लक्तरं व्हायची.. आता तर जपून ठेवावं असं काही राहिलंही नव्हतं तिच्याकडे, ज्या मिलनाची स्वप्नं तिने रंगवली होती, त्याच स्वप्नातून वास्तवाच्या भीषण दरीत तो तिला रोज ढकलत होता, तिथे प्रेम नव्हतं, काळजी नव्हती, तिच्या इच्छेचा आदर नव्हता, होती फक्त वासना आणि तिचं स्त्रीत्व... हा अत्याचार आता तिला सहन होत नव्हता, नको होतं तिला ते स्त्रीत्व, नको होते काळेभोर, लांबसडक केस, ती नितळ कांतीची तिला कात टाकावीशी वाटली, कंबरेचा तो घाटही तिला नकोसा झाला, ज्यात तिचं खरं अस्तित्व असतं ते वक्षही तिला नकोसे झाले, कारण ज्याने ह्या प्रत्येक अवयवाला फुलासारखं ज...