खेळ
वाचता वाचता अचानकच पुस्तक बंद मनात विचारांचं थैमान आणि डोक्यात प्रश्नांचं काहूर, एकमेकांत गुंतल्या व्यक्तिरेखा संवादाचं प्रचंड जंजाळ घटना-प्रसंग एकमेकांना करू लागले प्रश्नोत्तरं मनात सत्य-असत्याचा कल्लोळ हृदयाची वाढलेली धडधड संभ्रम, गोंधळ आणि उत्तराच्या अपेक्षेत आ वासून उभे असलेले प्रश्न डोकं बधीर आणि पुस्तक पुन्हा उघडलं. हे खरं ? ते खोटं ? नेमकी कशी करावी मी पडताळणी ? काही मापदंड ? कोणतंही तत्व ? की सगळेच माझ्या मनाचे खेळ ?