Posts

Showing posts from December 31, 2017

|| मौन ||

माझ्या मनात बरीच गुपितं, काही शब्द, दडलेले अर्थ, बऱ्याच कविता, स्पष्ट, अस्पष्ट ... पण, त्यांना कळलंच नाही मौन माझं, तऱ्हेतऱ्हेचे अर्थ लावले गेले, ' शब्दांची घेतली धास्ती ' ' कविता राहिली अर्धी ' असंख्य बातम्या, अगणित मथळे, माझं मौन कायम ... त्यांनी केली माझ्या मौनाची भाषांतरं, काहींनी अनुवाद केले, काहींना अर्थच लागले नाहीत, उरलेल्यांनी मात्र माझं मौन मॉडर्न कविता म्हटलं ... ते मौन केवळ त्याला कळलं, ना त्याचं भाषांतर झालं, ना अनुवाद, त्याचं केवळ चित्र झालं, एक सुरेख, तरल चित्र, लख्ख प्रकाश, भिंतींविना एक खोली, केवळ डोक्यावर छप्पर, मध्यभागी ती, कविता लिहीत असलेली, हेच ते चित्र आणि हेच तिचं मौन ...