नातं...
आईच्या गर्भात असल्यापासूनच आपल्यासमोर नात्यांची ही मोठ्ठाली रांग असते, आई, बाबा, आजी, आजोबा, खूप सारी नाती, बरेच नातेवाईक, आईच्या माहेरचे, बाबांच्या बाजूचे, प्रचंड लोकं... काही नाती ही रक्ताची असतात, तर काही आपण आपल्या आवडीने निवडतो.. पण हे नातं म्हणजे नेमकं काय? म्हणजे माणूस हा समाजात राहणारा घटक आहे, असं आपण सगळेच लहानपणापासूनच ऐकतोय, वाचतोय, आणि समाज म्हटला की लोक आले, लोक आले की मग आपले आणि परके किंवा अनोळखी, असा फरकही आलाच.. याचसोबत आलं नातं... नातं सांभाळता नाही आलं तर काचेला जसा तडा जातो, तसा नात्यालाही मग तडा जातो, कधीतरी छोट्याश्या वादाने, विनाकारण केलेल्या गैरसमजाने नात्याची काच फुटते. जर आपण काहीही विणायला बसलो, तर कधीतरी अचानक लोकर गुंतते, आणि मग बराच प्रयत्न करून ती सोडवावी लागते.. नात्याचं पण असंच असतं, ते कधीतरी न सुटण्याइतकं गुंततं, तर कधी नेमका एक दोरा ओढला की गुंता सुटतो, मात्र बऱ्याचदा असंही होतं की, नात्याचे दोर कापून आपल्याला हवे तेच नीट जपून ठेवावे लागतात.. नातं माणसा-माणसाला जोडतं आणि तोडतंसुद्धा, एकच नातं कधी जगायला भाग पाडतं, तर...