दिल से दिल तक..
नमस्कार! आजची पोस्ट थोडी खास आहे, म्हणजे माझ्यासाठी तशा सगळ्याच पोस्ट्स खास असतात पण आजची जरा जास्त खास आहे. आज कोणताही लेख नाही किंवा कविता नाही आज थेट “दिल से” लिखाण असणार आहे. तर २०१५ साली याच दिवशी म्हणजे ३ जून २०१५ला मी माझी पहिली पोस्ट शेअर केली होती, म्हणजे त्या दृष्टीने पाहिलं तर आज शब्दरांजण पाच वर्षांचं झालंय. आपलं शब्दरांजण पाच वर्षांचं झालंय. मला खरंतर काय लिहावं हे कळत नाहीये, कारण २०१५ साली वाटलंच नव्हतं की मी एवढ्या पुढपर्यंत येऊ शकेन. आजवर बऱ्याचदा मी हे बोललेय की, ‘लिहिणं आणि लिहीत राहणं यात फरक असतो’ आणि मला आनंद आहे की मी लिहीत राहिलेय. ही पोस्ट लिहिण्याआधी सहजच ब्लॉग चाळत होते, तेव्हा जाणवलं की, नाही म्हणता म्हणता मी आजवर जवळपास ७७ पोस्ट्स लिहिल्या आहेत. या पूर्ण प्रवासात नवनवीन वाचक सोबत येत गेले आणि शब्दरांजण बहरत गेलं. आधी एक-दोन असणारे फॉलोअर्स आज २३च्या घरात आहेत. तुम्हाला वाचून वाटेल की, ‘त्यात काय मोठं? तेवीसच तर आहेत’ पण माझ्यासाठी वाचकांची संख्या खूप महत्त्वाची आहे आणि हे असे असे वाचक आहेत ज्यांनी शब्दरांजणला सबस्क्राईब केलेलं आह...