फेसबुक..
तिने एका शहरात प्रवेश केला नाव होतं " वायफाय " आणि नावाखाली लिहिलं होतं २०७५. आश्चर्यच वाटलं तिला जरा पण बघूया पुढे म्हणत ती चालू लागली. एक बिल्डींग लागली पुढे " फेसबुक " नावाची, अचंबित होऊन ती आत शिरली पण एकही माणूस काही दिसेना.. नशिबाने एका घराचा दरवाजा उघडा दिसला, दबकत दबकत तिने हळूच जाऊन दारातून घरात पाहिलं, चार माणसं होती घरात पण प्रत्येकाच्या हातात 'iPhone', आजोबांसमोर मात्र appleचं macbook. ते मालिका बघत होते,' होणार पोस्ट मी त्या वॉलची '. एका मुलाने (मग पुन्हा तिच्याच नशिबाने) तिला पाहिलं, मात्र ती काही बोलेस्तोवर पुन्हा तो फोनमध्ये घुसला.. त्याला 'पोक' करेस्तो...