Posts

Showing posts from January 3, 2016

हुंदका..

एरवी प्रसन्न असलेलं घर आज रुसलं घराच्या खांबांपैकी एक खांब मुळापासून हलला नव्हे खरंतर मोडला.. तोल सावरणं घराला कठीण गेलं माजघरात चूल पेटली नाही, ओसरी एकाकी झाली , देवघरातले देव पूजेसाठी खोळंबले. तुळशीवृंदावनातली तुळसही मान टाकून पडली आणि घराचे दरवाजे कणा मोडलेल्यासारखे वाकले ... हुंदक्यांनी आज सारं अंगण भरलं सगळ्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहून आभाळही रडलं चौकोनाचा आज त्रिकोण झाला घराचं छप्पर हरवलं , "लगेच येतो गं!" म्हणून गेलेला माणूस निघून गेला अगदी कायमचा... आनंदाचे सोहळे पाहिलेल्या घरावर मृत्यूची छाया पसरली तिच्या कुंकवाने डोळे पुसले , बांगड्यांनी जगणं नाकारलं, तिचं हसणं स्मशानातल्या अग्नीत जळून गेलं. माजघर कासावीस झालं भिंती शहारल्या खिडकीच्या गजांनी उसासे टाकले खोल्याही गदगदून रडल्या.. त्याचं नसलेलं अस्तित्व घराला स्वीकारता येत नव्हतं कारण, घराला त्याचा स्पर्श मिळणार नव्हता तिला त्याचे श्वास मिळणार नव्हते दोन पिल्यांना बाबाची गोष्ट मिळणार नव्हती आणि " बछडयांनो, जरा पाय द्या पायावर." असं बाबा ह्यापुढे सांगणार नव्हता.. पण हे असं कित...