Posts

Showing posts from June 7, 2015

It's all about caring and sharing...

Image
Y esterday I was talking with a friend of mine and it was a general discussion about things.. but all of a sudden the mysterious topic of  " LOVE " came in.. He asked me what is love ? I took a minute's pause and replied love is friendship, but now I think love is much more than friendship, because we have so many friends but we love only one person...                               So, what is LOVE ? The most discussed topic in literature and films. I think love begins with friendship, You start talking to each other, then the time span increases from two minutes to two hours and you just don't notice that, you start looking for cheaper mobile plans. Even the chats increase. You start liking each picture of him, you follow each of his update. You try to gift him the best gift, may that be a perfume, a watch or just a poem which is written only for him.. But you know what?  these things are...

गच्ची....

आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एकतरी  हक्काची जागा असते...काहींसाठी ती जागा म्हणजे त्याचं घर असतं, तर काहींसाठी त्याचं घरातला कोपरा.. माझ्यासाठी माझ्या हककाच्या जागांपैकी एक म्हणजे माझी गच्ची.... गच्ची... गच्ची, प्रत्येकासाठी तशी तो वेगळीच गर्लफ्रेंडशी बोलण्यासाठी, दारूच्या पार्ट्या करण्यासाठी, पाय दुखेस्तोवर फेऱ्या मारण्यासाठी, नुसताच टाईमपास म्हणून गाणी ऐकण्यासाठी, सगळ्यासाठीच गच्ची.... पण माझ्यासाठी.. माझ्यासाठी गच्ची, गच्ची नाही तर तो एक स्तब्ध, शांत, मोकळा असा कोपरा आहे. तिला माझ्या सगळ्या गोष्टी कळतात, माझा हसतानाचा, रडतानाचा, लटक्या रागाने बोलतानाचा, सुन्न होऊन बसतानाचा, खूप विचार करतानाचा, कधी अस्वस्थ होऊन चिडतानाचा, प्रत्येक चेहरा ती ओळखते.... माझं निरागस बालपण, अल्लड कोवळं लहानपण, स्वप्नांनी भारलेलं तरुणपण, प्रेमातले सुंदर दिवस, विरहाच्या दु:खात झुरणारे दिवस, कायमचं तुटलेपण आल्यानंतरचे वेदनेचे दिवस, सगळं आयुष्यच ती ओळखते... माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण अन् क्षण ती जाणते, जपते, स्वतःतच ठेवते सुद्धा, माझ्या चुका न पाहता मला समजते, सुच...

तो आला....

अगदी चार दिवसांपूर्वी खिडकीच्याबाहेर पाहिलं तर डोळ्यांना दिपवेल इतकं प्रखर ऊन दिसायचं, उन्हाने वाळलेली झाडं दिसायची, तहानेने व्याकूळ झालेले पक्षी दिसायचे. पण आज, आज काही वेगळंच चित्र होतं. आकाशाचा रंग पालटला होता, हवेत गारवा होता आणि वा‌रयाने तर उच्छाद मांडला होता. आधी माझ्या खिडकीतली झाडं मंद डुलत होती, जणू काही शांत अशा भावगीताचा आस्वाद घेत होती. मग पंख्याची हवाही थोडी जास्त जाणवू लागली, स्वतःच स्वतःला खेळवू लागली. आणि अचानक माझं लक्ष खिडकीत गेलं, खिडकीतलं झाड न झाड कुंडीच्या ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत वाकत होतं, जर मी त्यांना हलक्याश्या दोऱ्याने बांधलं नसतं तर कंबरेचं हाड मोडलेल्या बाईसारखं ते झालं असतं. आज वारा इतका बेभान झाला होता की फक्त पाऊसच त्याला रोखू शकला असता, पण तो मात्र छळत होता सगळ्यांना, येण्याचं नावच घेत नव्हता तो वेडा.. आभाळ पुन्हा भरून आलं, गडद काळे ढग,सुसाट वारा आणि हळूहळू पसरत चाललेला अंधार, अंगावर येणारा तो दाट काळोख, खोलवर पसरत जाणारे ते ढग, तो येण्या न येण्याच्या कात्रीत सापडलाय, मग शेवटचा विचार करून तो आला, त्याच्या येण्याची आतुरतेने वा...