Posts

Showing posts from November 25, 2018

सकाळचं कोवळं ऊन

प्रेम ? अगदी प्रसन्न , जणू सकाळचं कोवळं ऊन.. प्रेम , तो – ती , तुम्ही आम्ही , आपली सुंदर हृदयं , प्रेम , आपल्या हृदयातील स्पंदनं.. प्रेम , स्वत्व , वेडेपणा , एकमेकांच्या आवडी , प्रेम , निरभ्र आकाश , थंडीची उबदार पहाट , सदाफुलीचं नाजूक फूल , सुकलेली गुलाबाची पाकळी..     प्रेम , भांडणं , वादावादी , अस्वस्थ रात्री , विस्कटलेली घडी , प्रेम , झुगारून दिलेल्या चालीरीती , सततची आश्वासक मिठी , कागदावरील ओळ खोडलेली , ताकद पुन्हा उभं राहण्याची.. प्रेम , स्पष्ट तरीही अस्पष्ट , कळूनही न कळलेली कविता , रंगाने माखलेला कुंचला , स्वैर उधळलेला घोडा , प्रेम , अबोल शांतता , मोकळा समुद्रकिनारा , मंद तेवणारा दिवा.. प्रेम , मायेचा सुंदर स्पर्श , बाईची गूढ योनी , तिचा काळासावळा देह , प्रेम , त्याचं आडदांड शरीर , त्यांच्या उघड्या छात्या , त्याची रात्रीची चुळबूळ.. प्रेम , निर्मळशी ओवी , सुंदरसा अभंग , समुद्र अथांग , प्रेम , त्याची निःशब्द कृती , व्यक्त अव्यक्त भावना , अन् तिच्या गर्भाती