काळी ठिक्कर...
हाय, आज फारच लवकर तुम्हाला पुन्हा भेटायला आले. दिवसात इतके प्रहर असतात, आळसावलेली पहाट, प्रसन्न सकाळ, रखरखलेली दुपार, सुंदर संध्याकाळ आणि शांत रात्र.. रात्र.. हा शब्द ऐकूनंच मला फार छान वाटतं, का विचारताय, मम्म, माहीत नाही बुवा. काही प्रश्नांची उत्तर न शोधलेलीच बरी. हा तर रात्र, रात्री ना, शांतता असते, कोणी त्रास देणारं नसतं, आपल्याच लयीत, आपल्याच मस्तीत लिहिता येतं, त्या लिखाणाचं लगेच परीक्षण करता येतं. नवनवीन कल्पना सुचतात आणि त्या अंमलात आणण्याची पद्धतही सुचते. ह्या अशाच सुंदर आणि माझ्या आवडत्या रात्रीवर मी एक कविता केली आहे. मध्यंतरी बडोद्याला जात असताना ट्रेनमध्ये झोप येत नव्हती आणि तेव्हा अचानकच कविता सुचली.. प्रस्तावना खूप झालीये ना? त्यामुळे आता कवितेकडेच येते, तिचं शीर्षकही रात्रच आहे... रात्र बऱ्याच रात्री जागले मी, एक सुंदर सकाळ पाहण्यासाठी.. शहरातल्या रात्री मात्र झगमगलेल्या होत्या, नाईट क्लब्स, डिस्को थेक्समध्ये नाचणाऱ्या होत्या आणि दारूच्या नशेत, झोपाळलेल्या डोळ्यांनी दहा बारा वाजता होणारी सकाळ होती.. पण मला हवी असलेली रात्र अशी नव्हती. उलट ती शा...