त्या तिघी...
आज सकाळी ९.३० च्या सुमारास रेल्वेने प्रवास करत होते, बाहेर हलकासा पाऊस पडत होता. स्त्रियांच्या डब्यात अगदी गर्दीही नव्हती आणि डबा पूर्ण रिकामाही नव्हता. ऑफिसला जाणाऱ्या बायका, मुली, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली आणि कानातल्यासारख्या तत्सम वस्तू विकणारे काही विक्रेते असे सगळे ह्या डब्यात प्रवास करत होते. मी मस्त लोखंडी बंदिस्त खिडकीतून बाहेरचं विस्तीर्ण, ढगाळ आभाळ पाहत होते. पहिलं स्थानक येऊन गेलं आणि माझ्या समोरच्या दाराजवळच्या मोकळ्या जागी एक साध्याश्या लाल साडीतली एक स्त्री मोठ्याने हसत येऊन उभी राहिली. तिच्याच मागून निळ्या साडीतली दुसरी स्त्री अशीच हसत आली, त्या निळ्या साडीतल्या स्त्रीने लाल साडीवाल्या स्त्रीला हसत हसत कानात काहीतरी सांगितलं आणि दोघीही मोठमोठ्याने हसू लागल्या. या दोन्ही स्त्रिया आधीच म्हटल्याप्रमाणे साध्याश्या साडीत होत्या, दोघींच्या खांद्याला पर्सही होत्या पण थोड्या हलक्या प्रत...