पाऊस आला, वारा आला...
नमस्कार मंडळी ! कसं काय ? बरं चाललंय ना सगळ्यांचं ? आज पोस्टसाठी वेगळंच काहीतरी लिहायचं ठरवलं होतं, पण सकाळी अचानक आलेल्या पावसाने सगळा मूडच बदलून टाकला माझा.. मग म्हटलं इतर सगळं नंतर लिहू आधी लिहायचं आजच्या सुंदर सकाळबद्दल . आज सकाळी जेव्हा पाऊस कोसळत होता तेव्हा खरंतर मी गाढ झोपले होते, मैत्रिणी आल्याही होत्या उठवायला पण आपल्या मुलीला इतकं सुखी झोपलेलं पाहून आईला काय मला उठवावंस वाटलं नाही. थोडासा राग आला मला तिचा पण म्हटलं जाऊ देत त्यानिमित्ताने झोपायला मिळालं. तर मला जाग आली ब्राउनीच्या भुंकण्याने, खिडकीबाहेर पाहिलं तर मस्त पाऊस पडत होता, इतकं छान, फ्रेश वाटलं की मी ब्रशही न करता तशीच गच्चीवर पळाले. तुम्ही पावसाळ्यात कुठेही भिजायला जा, मरीन ड्राईव्ह, वरळी सी-फेस, दादर चौपाटी अगदी कुठेही पण जिथे तुम्ही लहानपणी खेळलात, वेड्यासारखे गाणी म्हणत नाचलात, ‘ये रे ये रे पावसा’ म्हणत पावसाला साद घातलीत त्याच ठिकाणी, त्याच मित्रमैत्रिणींबरोबर पहिल्या पावसात भिजण्याची मजा काही औरच अस...