खास तुमच्यासाठी....
३ जून २०१५ माझ्यासाठी एक खास दिवस कारण त्यादिवशी, खरंतर रात्री मी माझी अनुदिनी लिहायला सुरुवात केली. माझ्यासाठी हा एक प्रयोग होता, कारण लिहिता येणं वेगळं आणि सातत्याने लिहित राहणं वेगळं. मला लिहिता येत होतं पण तेच सातत्याने जमेल का हे पडताळून पाहण्यासाठी ही अनुदिनी होती खरंतर. आणि वर्ष होऊन गेलंय या गोष्टीला पण आता मी म्हणू शकते की हो मला लिहिताही येतंय आणि सातत्यानेही लिहिता येतंय. शब्दरांजण एक वर्षाचं झालंय. पण शब्दारांजणाचा प्रवास सुरु झाला त्याच्या नावापासून, बरचं डोकं खाजवत होते मी की नाव काय असावं अनुदिनीचं आणि माझ्यासोबत अजून एक व्यक्ती ह्याचा माझ्याच इतका खोलवर विचार करत होती, ती व्यक्ती म्हणजे 'प्रणव सुर्वे' . आज "शब्दरांजण" इतक्या थाटात शब्दरांजण म्हणून मिरवतंय ते ...