शब्द, शब्द आणि शब्द ...
शब्द, कसे सुचतात शब्द ? खरंतर आजवर मीही ह्यावर विचार केला नव्हता की खरंच मला कसे सुचत्तात शब्द ? ते बाहेरच्या जगात असतात ? की माझ्याच आत, मनात, खोलवर कुठेतरी दडलेले असतात ? उत्तर मी अजूनही शोधतेय, कारण होतं काय की सुचणं ही एक प्रक्रिया आहे पण ती वैज्ञानिक प्रक्रिया नाही. ती एक कला आहे आणि कलेशी निगडीत प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या चौकटीत बसवता येत नाही, जरी आलीच बसवता तरी कलासक्त माणसांना ती पटतेच असं नाही. माझंही अगदी तसंच झालंय , म्हणजे एकीकडे भाषाविज्ञानात मी शब्द, भाषा, ध्वनी यांच्याशी निगडीत गोष्टी शिकले पण ते सगळंच कलेच्या कक्षेत न बसणारं आ...