खास तुमच्यासाठी....


                          ३ जून २०१५  माझ्यासाठी एक खास दिवस कारण त्यादिवशी, खरंतर रात्री  मी माझी अनुदिनी लिहायला सुरुवात केली. माझ्यासाठी हा एक प्रयोग होता, कारण लिहिता येणं वेगळं आणि सातत्याने लिहित राहणं वेगळं. मला लिहिता येत होतं पण तेच सातत्याने जमेल का हे पडताळून पाहण्यासाठी ही अनुदिनी होती खरंतर. आणि वर्ष होऊन गेलंय या गोष्टीला पण आता मी म्हणू शकते की हो मला लिहिताही येतंय आणि सातत्यानेही लिहिता येतंय.

                         शब्दरांजण एक वर्षाचं झालंय. पण शब्दारांजणाचा प्रवास सुरु झाला त्याच्या नावापासून, बरचं डोकं खाजवत होते मी की नाव काय असावं अनुदिनीचं आणि माझ्यासोबत अजून  एक व्यक्ती ह्याचा माझ्याच इतका खोलवर विचार करत होती, ती व्यक्ती म्हणजे 'प्रणव सुर्वे' . आज "शब्दरांजण" इतक्या थाटात शब्दरांजण म्हणून मिरवतंय ते नाव ह्याच माणसाने सुचवलंय. नाव तर झालं पण अजून बऱ्याच तांत्रिक गोष्टी होत्या, कुठल्या स्थळावर अनुदिनी उघडायची, कशी उघडायची असं आणि अनुज बरचं काही. या सगळ्या बाबतीत मला 'नताली लुकतुके' आणि 'आशिष तटटू' या दोघांची खूप मदत झाली. आणि मग खऱ्या अर्थाने शब्दारांजण खुलं झालं तुमच्यासाठी, माझ्या मौल्यवान वाचकांसाठी. अगदी मनापासून सांगते की इतका प्रतिसाद मिळेल असं मला वाटलं नव्हतं, म्हणजे तुम्हाला लिखाण आवडेल ही खात्री होती पण हा प्रवास इतका आल्हाददायक होईल याची आशा नव्हती.

                         या प्रवासात महत्वाचे आहात ते तुम्ही सगळे, माझे वाचक. वर्षभरापूर्वी मला वाटलंही नव्हतं की माझं लिखाण वाचणारे माझे वाचक असतील आणि त्यांना मी असं धन्यवाद म्हणत असेन. पण खरचं मनापासून धन्यवाद देते मी माझ्या मित्रमैत्रिणींना, काका- काकूंना आणि मला माहित नाही पण शब्दारांजण कोणी आजी-आजोबा वाचत असतील तर त्यांनाही धन्यवाद. तुम्ही असेच वाचत रहा म्हणजे मला लिहिण्याचं बळ मिळेल. काही नावं विशेष उल्लेख करून नमूद करावीशी वाटताहेत. 'नताली लुकतुके', 'आशिष तटटू', 'अनुजा लिमये', 'अभिषेक शेट्ये', 'आरती शेट्ये' ,'प्रणोती म्हात्रे','आर्जवी म्हात्रे','श्रद्धा म्हात्रे ','रुचिता म्हात्रे', 'प्रणय मालुसरे', 'प्रणाली मालुसरे', 'स्वानंद गाडगीळ', 'जुईली गायकवाड', 'हेमांगी मातोंडकर' , 'श्रद्धा चोरगे', 'अक्षय गायकवाड','प्रणय करगुटकर','साधना दाते ','जाई कुलकर्णी ','जान्हवी दीक्षित ','प्रियांका मयेकर -भिसे','आकाश पाटणकर ','संकेत खोत ','संकेत पोतदार','मंदार म्हसकर '.'वृषाली सुर्वे ','वैष्णवी राणे','जयेश कांगणे ','प्रज्ञा बोरकर '  तुमची नावं घेतल्याशिवाय ही पोस्ट पूर्ण होऊच शकणार नाही. फेसबुक पेजवरच्या वाचकांनाही धन्यवाद.

                         'प्रणव सुर्वे' 'निशिकांत वायळ','संजोग म्हात्रे ', 'योगेश अभंग ','जुईली सामंत ','अस्मिता चव्हाण ' तुम्हाला वेगळ्याने नोंदवावंसं वाटलं कारण तुम्ही तुमची मतंही मांडता, आणि लेखकाला ती खूप महत्वाची वाटतात. निशिकांत आणि संजोग तुम्ही प्रत्येक पोस्टला हेच म्हणता कसं सुचतं तुला हे सगळं. आता मी कसं सांगू ते? कारण एका वाक्यात त्याचं उत्तर नाही देता येणार, पण माझ्या पुढच्या पोस्टमध्ये मी त्याचं काही अंशी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेन. 'राधिका कुंटे' राधिकाताई तुम्हाला खास धन्यवाद, वेळात वेळ काढून तूम्हीदेखील पोस्ट वाचता.  'स्नेहा गाडगीळ' आणि 'रश्मी पवार' काकू घरचं काम सांभाळून 'प्रशंसा सुर्वे' रुग्णांना सांभाळून आणि घरचं  अशी दोन्ही काम सांभाळून उशिरा का होईना पण पोस्ट वाचता त्याबद्दल धन्यवाद. 'प्रसेन सरमळकर'  प्रत्येक पोस्ट वाचून "शाब्बास जुया, ह्यावर काहीतरी करूया, YouTube channel काढूया, रेकॉर्ड करूयात" असं म्हणणारा हा एकच माणूस..  ह्यावेळी मला इतकीच नावं आठवतायत, मला मनापासून ह्या सगळ्यांना आणि कोणी राहून गेलं असेल तर त्यांनाही धन्यवाद द्यायचे होते आणि म्हणून हा इतका खटाटोप. माझा मामा 'सुनील पेडणेकर' आई 'शर्वरी म्हात्रे' आणि बाबा 'आदेश म्हात्रे' धन्यवाद तुमच्या प्रत्येक निरीक्षणाबद्दल. 'वैशाली जावळेकर' ,'अनघा मांडवकर ' धन्यवाद बाई.. :-)

                         सध्या एकच वर्ष झालंय, शब्दरांजण अजून बराच भरायचंय, शब्दांनी, अनुभवांनी आणि तुमच्या प्रेमानी. तुम्हाला वेळ मिळेल, जमेल तसं वाचत रहा, जे आवडेल ते वाचा, पुस्तकांसारखा सवंगडी शोधून सापडणार नाही.तुम्हालाही माझ्या शब्दांसोबत वर्षभराचा प्रवास पार पडल्याच्या मनापासून शुभेच्छा, कारण शब्दरांजण तुमचंही आहे.. :-) 
                                             निम्मित वर्षपूर्तीचं
                                             तुमच्या प्रेमाच्या वर्षावाचं
                                             शब्दांचा हा प्रवास असाच सुरु राहील,
                                             शब्दरांजण असचं बहरत जाईल...
                      

----------

Comments

  1. Apratim...shabdaranjan 100 varshach hovo hi sadicha

    ReplyDelete
    Replies
    1. :-) Dhanyawaad Pranay, 100 varshachi gvahi det nahi pan lihit rahin me... :-)

      Delete
  2. Shabdranjan duthadibharun vahude

    ReplyDelete
  3. Shabdranjan duthadibharun vahude

    ReplyDelete
  4. छान.. हे शब्दरांजण असच भरूदे.. :) :) :)

    ReplyDelete
  5. सर्वात आधी तुझं खूप खूप अभिनंदन. तू अगदी बरोबर नमूद केलास की लिहिता येणं आणि सातत्याने लिहिता येऊन लिहित राहणा वेगळा. तू शब्दारांजाण सुरु केलास आणि हे रांजण तू सत्यात्याने भरत राहिलीस यासाठी खूप अभिनंदन. मी माझ्या बाजूनी तशी विशेष मदत केली नाही तर फक्त मला माहित असलेल्या गोष्टी तुला सांगितल्या. तुझ्या सगळ्या posts अजून वाचून झालेल्या नाहीत पण जमेल तसा मी वाचत राहतो आणि मला वर्षभर याच गोष्टीचा आनंद आहे की हे रांजण सतत दर्जेदार शब्दांनी भरत आहे. मला काय बोलू कळत नाहीये इतका आनंद मला अत्ता झालाय! हे रांजण असंच भरूदे आणि अशी अनेक यशस्वी वर्षं शब्दारांजाणला मिळो हीच अशा आणि त्यासाठी शुभेच्चा! Love You, जुई!

    ReplyDelete
    Replies
    1. तुझी comment मला नेहमी निःशब्द करते आशिष.. हे शब्दरांजण तुमच्यामुळे सुरु आहे, कारण लेखकाचं लिखाण वाचायला वाचक नसेल तर त्या लिखाणाचा काय फायदा.. मला माहितीये तुला सगळं वाचता आलेलं नाहीये पण तू वेळ मिळेल तसं वाचशील ह्याची खात्री आहे मला.. धन्यवाद तुझ्या शुभेच्छांबद्दल. Love You आश्या.. :-)

      Delete
  6. Tuzh शब्दरांजण asach suru rahude...☺️

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

दिल से दिल तक..