सर्वसामान्य...

जवळ जवळ दोन वर्षांपूर्वीची गोष्ट असेल.

मी नेहमीप्रमाणे कॉलेजवरून येत होते, खरंतर गर्दीची वेळ नव्हती पण 'दादर स्टेशन' म्हटलं की तिथे कधीही गर्दी असतेच, आणि नेमकं ,माझं दादरला काम होतं..
काम झालं, मी ट्रेनची वाट पाहत उभी होते आणि समोरच मला बाकड्यावर बसायचं सोडून खाली रस्त्यावर बसलेली एक बाई दिसली,
हो,
बाईच ना ?
रस्त्यावर बसलेली 'स्त्री', असं सामान्य माणसं बोलत नाहीत, होय ना?

स्त्री म्हणजे पुस्तकात, आत्मचरित्रात किंवा कवितेत शोभणारा शब्द आहे..
पण ती स्त्री कितीही मोठी असली, तरी शेवटी पुरूष जेव्हा तिच्याकडे पाहतो आणि त्याची नजर जेव्हा 'अरे, ही सुंदर आहे' म्हणून असणाऱ्या कौतुकाच्या पुढे जाते तेव्हा ती नजर बोचते, आणि इतकी लागते की त्यापेक्षा सहन केलेला शारीरिक छळ परवडेल..

तर, ती बाई,
मग उठून उभी राहिली,

तिची भिरभिरणारी नजर ,
ती काहीतरी शोधत होती,

घाबरली होती ती,
पण कशाला ?
काय माहित,
कदाचित तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता ...

तिला बघून सुचलेली ही कविता,


गर्दीच्या चेहऱ्यातून ती मला दिसली,
भेदरलेल्या नजरेने पाहत होती ती लोकांना,

जगालेखी एक रस्त्यावरची बाई,
पण तिच्या नजरेत मला स्त्री दिसली..

गर्दीतसुद्धा पदर सांभाळत वाट काढणारी,
स्वतःला जपत, सावरत चालणारी...

ती गर्दी मग मी तिच्या नजरेतून पाहिली,
गर्दीची नजर वखवखलेली होती,
एका अमानुषाची होती.

तेव्हा जाणवलं की आम्ही सारख्या आहोत,
कारण ती काय, मी काय 'बाई' आहोत,
नराधमांच्या लेखी वासनापूर्ती म्हणून बाई,
मुलांच्या जन्मासाठीचे यंत्र म्हणून बाई,
आणि easily available पण बाईच....

ही बाई मुलगी, बहीण, मैत्रीण, प्रेयसी,पत्नी
नसतेच तर ती बाईच असते..

आज मला खरंच ती आणि मी एक वाटलो,
तिची ती भीती, काळजी माझीही होती,
वासनामय नजरेतून वाचण्याची धडपड माझीही होती,
तिच्या पदरासारखी ओढणी सांभाळण्याची गरज माझीही होती,

ती गरज माझीही होती.....





Comments

  1. Khara ahe tuza... Bai ani Stree ya kalpana itkya bhinna prakare ekhadya cha dokyat rujawlya jatat ki ekhadyacha tasa intention nastana hi to sahaj bolun jato. intentionally asel tar vait ch pan unintentionally hota... kiti pagda ahe junya goshtincha aplyavar! Farach chhan mandlas! Change is constant ani to zalach pahije...

    ReplyDelete
  2. Dhanyawaad Ashish..😊
    Hooy na, mhanje aapan tya goshti itkya veglya kaa samjlya jatat he samjun ghenyaadhich blindly te sagla follow karto...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

काळी ठिक्कर...