प्रेमझुला..

ती सुंदर रात्र.
त्या रात्रीत आवेग होता
प्रेमाचा,
स्पर्शाचा,
उन्मादाचा..

त्या रात्री शब्द नव्हते ,
आपली शरीरं संवादत होती,
ती रात्रच काही वेगळी होती..

अगदी अलगद ती उलगडत होती,
तुझे डोळेच सगळं बोलत होते,
माझ्या हृदयाचे ठोके वाऱ्याच्या वेगाने धावत होते,
तुझ्या नजरेने मी कोमेजत होते,
कणखर अशा तुझ्या बाहुपाशात मी विसावत होते,
माझ्या ओठांची प्रत्येक हालचाल तुझे डोळे टिपत होते,
शेवटी सावज पकडावं तसं तुझ्या ओठांनी त्यावर नेम धरला,
आणि सुरु झालं एक द्वंद्व,
तुझ्या माझ्या ओठांचं,
त्यावरल्या प्रत्येक गुंत्याचं..

तुझा आवेग मग वाढत गेला,
आणि मी घायाळ होत गेले,
तुझ्या नजरेने लाजलाजरी झाले,
मीही मग तुझ्यामाझ्या प्रेमाच्या झुल्यावर झुलू लागले,
संथ ,
शांत,
लयीत..

तू फार खोलवर स्पर्शून गेला होतास,
तुझ्या उष्ण श्वासात,
तुझ्या थरथरणाऱ्या शरीरात,
तुझ्या बळकट पकडीत,
मी न्हाऊन निघत होते,
ओठांचं द्वंद्व अजूनही सुरूच होतं...

झुल्याचा वेग मग वाढू लागला ,
मीही सुखाने हिंदकळत होते,
आपले उसासे लयबद्ध ताल धरत होते..

झुल्याने अगदी उंच झोका घेतला,
आणि आपण दोघंही कोसळलो,
एकमेकांच्या विळख्यात,
क्षीणलेल्या सुंदर जाळ्यात,
आणि परमोच्च सुखाच्या डोहात,
आपण दोघंही कोसळलो..



Comments

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

ती...