त्या तिघी...
आज सकाळी ९.३० च्या सुमारास रेल्वेने प्रवास करत होते, बाहेर हलकासा पाऊस पडत होता. स्त्रियांच्या डब्यात अगदी गर्दीही नव्हती आणि डबा पूर्ण रिकामाही नव्हता. ऑफिसला जाणाऱ्या बायका, मुली, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली आणि कानातल्यासारख्या तत्सम वस्तू विकणारे काही विक्रेते असे सगळे ह्या डब्यात प्रवास करत होते.
मी मस्त लोखंडी बंदिस्त खिडकीतून बाहेरचं विस्तीर्ण, ढगाळ आभाळ पाहत होते. पहिलं स्थानक येऊन गेलं आणि माझ्या समोरच्या दाराजवळच्या मोकळ्या जागी एक साध्याश्या लाल साडीतली एक स्त्री मोठ्याने हसत येऊन उभी राहिली. तिच्याच मागून निळ्या साडीतली दुसरी स्त्री अशीच हसत आली, त्या निळ्या साडीतल्या स्त्रीने लाल साडीवाल्या स्त्रीला हसत हसत कानात काहीतरी सांगितलं आणि दोघीही मोठमोठ्याने हसू लागल्या. या दोन्ही स्त्रिया आधीच म्हटल्याप्रमाणे साध्याश्या साडीत होत्या, दोघींच्या खांद्याला पर्सही होत्या पण थोड्या हलक्या प्रतीच्या. त्यांच्या हातात छत्र्याही होत्या, एकूणच त्यांच्या पोशाख आणि इतर गोष्टींवरून त्यांच्या मध्यमवर्गीय परिस्थितीचा अंदाज येत होता.
ह्या दोन स्त्रियांचं मनमोकळं हसणं सुरु असताना पिवळ्या साडीतली अजून एक स्त्री त्यांच्यात सामील झाली. अजूनपर्यंत त्या काय बोलतायत हे मला ऐकू येत नव्हतं, मात्र ती पिवळ्या साडीतली स्त्री आल्याआल्या "सांगायलस ना तिला ? आता बघ तुला सांगतेय का काही" असं सुंदर सुरात बोलली. इतकं छान वाटलं ते ऐकायला, म्हणजे एक वेगळाच गोडवा होता त्या सुरात. भाषाही गावाकडली साधी पण जवळची वाटणारी. ती पिवळ्या साडीतली स्त्री मला फार आवडली, तिच्या हातात लहान मुलींकडे असते तशी गुलाबी रंगाची छत्री होती, डोक्यावर धरली तर किमान डोकं कसंबसं सुकं राहील इतकी छोटी. पण रेखीव होती ती साधी, सोज्वळ. मला मग त्या तीन स्त्रिया अजून काय काय बोलतायत हे ऐकायचं होतं कारण पारोशी भाषेचा अभ्यास केल्यानंतर जवळ जवळ चार महिन्यांनी पुन्हा थोडं तसंच काहीसं गोड कानावर पडत होतं.
त्यांना जणू माझ्या मनातलं कळलं असावं आणि नेमक्या त्या माझ्या डाव्या बाजूंच्या आसनावर येऊन बसल्या. त्या तिघीही त्यांच्या त्यांच्या विश्वात मग्न होत्या, आपल्या आजूबाजूला टापटीप, नीटनेटके पोशाख घातलेल्या बायका आहेत आणि आपण साधी पॉलियस्टरची साडी नेसून ती चिखलाने खराब होऊ नये म्हणून आतला साडीच्या रंगापेक्षा वेगळ्याच रंगाचा परकर दिसत असूनही वर खोचली आहे, किंवा अस्खलितपणे इंग्रजी बोलणाऱ्या बायकांत आपण आपल्याच भाषेत हेल काढत बोलतोय याचा जरासाही कमीपणा त्यांच्या ठिकाणी दिसत नव्हता. उलट शिष्टाचार पाळणाऱ्या इतर बायकांच्या तुलनेत ह्या बायका मला जास्त आनंदी वाटल्या. आयफोन आणि सॅमसंगच्या आडून गालातल्या गालात हसणाऱ्यांपेक्षा त्या तिघींचं हसणं, मोकळेपणाने मोठ्याने बोलणं अगदी कुठल्याही चौकटीत न बसता खुलेपणानं श्वास घेत होतं. त्या उपभोगत असलेला आनंद उपभोगण्यात मी इतकी गढून गेले की माझी उतरण्याची वेळ आली, नाहीतर कदाचित मी त्यांच्यासोबत जाऊन बोललेही असते.
असे छोटे छोटे प्रसंग आनंद देणारे असतात, त्या प्रसंगांना शोधण्यासाठी फार मेहनतही घ्यावी लागत नाही. हा पण खोट्याचा मुखवटा न चढवता तुम्ही जसे कसे असाल, गरीब श्रीमंत, रागीट, शांत तसंच जगणं ही गोष्ट जरूर लागते. सगळ्यात सुंदर गोष्ट असते ती तुमचं असणं. आणि सगळ्यात निर्मळ असतं तुमचं हास्य, ते जपा, हसत रहा आणि आभाळातल्या पक्षासारखं मोकळं जगात रहा.

local madhe kiti tari ase prasang ghadtat pan tyavar vichar karan matra rahun jaat .. pan tula te khup chan jamal :) .. chan lihilays
ReplyDeleteधन्यवाद हर्षदा :-)
ReplyDelete