खेळ
वाचता वाचता अचानकच
पुस्तक बंद
मनात विचारांचं थैमान
आणि डोक्यात प्रश्नांचं काहूर,
एकमेकांत गुंतल्या व्यक्तिरेखा
संवादाचं प्रचंड जंजाळ
घटना-प्रसंग एकमेकांना
करू लागले प्रश्नोत्तरं
मनात सत्य-असत्याचा कल्लोळ
हृदयाची वाढलेली धडधड
संभ्रम,
गोंधळ
आणि उत्तराच्या अपेक्षेत
आ वासून उभे असलेले प्रश्न
डोकं बधीर आणि
पुस्तक पुन्हा उघडलं.
हे खरं ?
ते खोटं ?
नेमकी कशी करावी मी पडताळणी ?
काही मापदंड ?
कोणतंही तत्व ?
की सगळेच माझ्या मनाचे खेळ ?
Buy Marathi Book-www.parissparsh.com
ReplyDelete