निघता निघता भाषेबद्दल थोडंसं..

रामराम मंडळी ! पहिल्या पोस्टला दिलेल्या सुंदर प्रतिसादालाबद्दल खूप खूप धन्यवाद.

अपेक्षा नसताना मिळालेल्या गोष्टी जास्त सुंदर वाटतात आणि मी अपेक्षा ठेवत नाही त्यामुळे हे स्वागत खूप सुखावणारं होतं. काहींनी पोस्टच्या खाली प्रतिसाद दिले, तर काहींनी फेसबुकवर पण त्या सगळ्यापेक्षा जास्त
वाॅट्सअॅप वर प्रतिसाद आले आणि ह्या सगळ्यात एकच समान प्रतिसाद  होता आणि तो म्हणजे पुढची पोस्ट लिहिलीस की कळव. त्याचसंदर्भात  ही पोस्ट.

तर आज ज्यांना माहित नाहीये त्यांना एक नवीन पर्याय मी सांगणार आहे ज्याने तुम्हाला तुमच्या ईमेल वर कळेल की मी नवीन पोस्ट टाकली आहे. त्यासाठी तुम्हाला माझा ब्लॉग उघडल्यावर उजव्या बाजूला 'follow with email' असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केलंत की तुमचा id द्या मग झालं, मग माझ्या पोस्टचा अपडेट तुम्हाला येईल. ह्याने होईल हे की तुम्हाला तुमच्या इतर ई पत्रांसोबत माझी पोस्टही कळेल.

माझ्या बऱ्याच मित्रमैत्रिणींना पोस्टच्या खाली कमेंट देता येत नव्हती तर आता तुम्हाला तीही देता येईल. हे सगळं आज सांगितलं कारण कालचा दिवस मी हे सगळे पर्याय धुंडाळून काढले.
आणि हो सॉरी बरं का..
आता तुम्ही म्हणाल सॉरी का तर ते ह्यासाठी की मी उशिरा ह्या गोष्टी कळवल्या कारण काय आहे मीसुद्धा पहिल्यांदाच ह्या गोष्टी करतेय ना, त्यामुळे जरा वेळ लागला.

मात्र तरीही तुम्हाला वर सांगितलेलं काही करायचं नसेल तर मला कळवा मी जेव्हा नवीन पोस्ट टाकेन तेव्हा तुम्हाला कळवेन आणि ह्यात मला आनंदच होईल. खरंतर इथे मला एक हसणाऱ्या चेहऱ्याची स्माईली टाकायची होती पण हा पर्याय मला नाही सापडलाय अजून आणि माझा शोध सुरु आहे, ब्लॉग लिहिणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो मला ह्यात मदत करा हं.

ही पोस्ट वाचून कदाचित तुम्हाला कंटाळा येईल पण मला ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणं महत्वाचं वाटलं त्यामुळे ही पोस्ट लिहितेय.. जे सांगायचं ते सांगूनही  झालंय त्यामुळे आता मी खरी पोस्ट लिहायला घेते..

तुम्हाला माहितीये जेव्हापासून ब्लॉग सुरु केलाय तेव्हापासून रात्री मी उद्या काय लिहायचं ह्यावर विचार केल्याशिवाय झोपत नाहीये, तो जणू एक चाळाचं लागलाय मला.. अर्थात ह्याचा त्रासही होतोय मला पण ही नव्याची नवलाई आहे त्यामुळे थोडे दिवस हे असं होईल. 

कधीतरी असं होईल की मी जे लिहितेय ते तुम्हाला पटणार नाही, किंवा आवडणार नाही, अथवा तुमचं त्याबाबतीत काही वेगळं मत असेल, काही वेगळं ज्ञान तुमच्याकडे असेल तर मला ते जाणून घ्यायला खूप आवडेल. आणि ते फक्त मीच वाचावं असं नाही तर तुम्ही कमेंट्स मध्ये लिहा, त्यामुळे सगळे जण ते वाचतील आणि त्यावर संवाद घडेल.. इथे फक्त मी लिहिलं आणि तुम्ही वाचलंत असं नसावं कारण मग शब्दरांजणात तेवढेच शब्द राहतील आणि त्यात फक्त माझाच आवाज घुमेल , पण मला हे शब्दरांजण बोलकं असलेलं जास्त आवडेल. 


आता थोडं भाषेबद्दल...
आपल्याला मिळालेली वाचा आणि पर्यायाने भाषा ही सगळ्यात मोठी शक्ती आहे. तिचं महत्व फार थोड्यांना कळतं, आणि मग भाषा कशीही वापरली जाते. जसं आपलं नाव कोणी चुकीचं उच्चारलं की आपलं डोकं फिरतं (मुद्दाम डोकं फिरतं म्हटलंय कारण बऱ्याच जणांचं फिरतं आणि हो माझंही.. )
तर तसंच भाषा चुकीची उच्चारली की माझंही डोकं फिरतं. म्हणजे एका भाषेत दुसऱ्या भाषेतले शब्द आलेले चालतात कारण ते भाषा-भाषांमधल्या संपर्काचं प्रतीक असतं. 

मात्र बऱ्याचदा मिळालं ला भेटलं म्हटलं जातं आणि हल्ली ती गोष्ट इतकी सामान्य झालीये की आमच्या पुढची पिढी कदाचित हे असंच शिकेल, जे खूप चुकीचं असेल. 
हे सगळं आत्ताची पिढी रोखू शकते, त्यासाठी इतकंच करावं लागेल की जिथे असं चुकीचं ऐकू येईल तिथे त्या व्यक्तीची परवानगी घेऊन ती चूक सुधारावी लागेल. 
ह्या सगळ्यात तुमचा स्वतःवरचा संयम मात्र सुटू द्यायचा नाही कारण भाषेपेक्षाही संदेशन आणि त्याहीपेक्षा महत्वाचा एखाद्या व्यक्तीचा आदर असतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी नक्की घ्या.

जाता जाता भाषेवर लिहिण्याचं कारण सांगून जाते, तर ते कारण असं आहे की मी भाषाविज्ञानाची विद्यार्थिनी आहे, आणि भाषा कुठलीही असो तिच्याबद्दल मला आदर आहे, आणि तिच्या बरोबर वापराची जाणीवही आहे. त्त्याबद्दल तुम्हीही विचार केला असेल किंवा करत असाल पण मलाही माझा विचार मांडणं जरुरीचं वाटलं.. ह्यावर तुम्ही नक्कीच विचार करा आणि ते मला मात्र कळवा हं. 

आता निघण्याची वेळ झाली, सगळ्यांनी काळजी घ्या, आनंदी राहा, घरच्यांना वेळ द्या आणि भरभरून प्रेम करा, फक्त माणसांवर नव्हे तर छोट्याश्या फुलावरही प्रेम करा.. 

मी निघते पुन्हा भेटूया !





Comments

  1. He sambhashan faar uttam paryay ahe. Vyakta honyacha ani raanjan bharun ghenyacha... Ani bhashe baddal tu mhantes tya peksha vegla maza mat nahi. Bhasha hi ek bhet ahe,tashich japa ti.... :)

    ReplyDelete
  2. होय संवाद नेहमीच उत्तम असतो 😊.. होय आपली भाषा आपणच जपावी, कुठलाही न्यूनगंड न बाळगता.. ☺

    ReplyDelete
  3. same pinch tai... mala hi blogs sites email etc barobar hatalta yet nahi... tuzya lakshat aselch ki comment kashi karaychi he dekhil mi tulach vicharlay.. mala hi halu halu yasarvanch dnyan det rah mhnje zal.. :)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

दिल से दिल तक..