काळी ठिक्कर...
हाय, आज फारच लवकर तुम्हाला पुन्हा भेटायला आले.
दिवसात इतके प्रहर असतात, आळसावलेली पहाट, प्रसन्न सकाळ, रखरखलेली दुपार, सुंदर संध्याकाळ आणि शांत रात्र..
रात्र.. हा शब्द ऐकूनंच मला फार छान वाटतं,
का विचारताय,
मम्म, माहीत नाही बुवा. काही प्रश्नांची उत्तर न शोधलेलीच बरी.
हा तर रात्र,
रात्री ना, शांतता असते, कोणी त्रास देणारं नसतं, आपल्याच लयीत, आपल्याच मस्तीत लिहिता येतं, त्या लिखाणाचं लगेच परीक्षण करता येतं. नवनवीन कल्पना सुचतात आणि त्या अंमलात आणण्याची पद्धतही सुचते.
ह्या अशाच सुंदर आणि माझ्या आवडत्या रात्रीवर मी एक कविता केली आहे. मध्यंतरी बडोद्याला जात असताना ट्रेनमध्ये झोप येत नव्हती आणि तेव्हा अचानकच कविता सुचली..
प्रस्तावना खूप झालीये ना? त्यामुळे आता कवितेकडेच येते, तिचं शीर्षकही रात्रच आहे...
रात्र
बऱ्याच रात्री जागले मी,
एक सुंदर सकाळ पाहण्यासाठी..
शहरातल्या रात्री मात्र झगमगलेल्या होत्या,
नाईट क्लब्स, डिस्को थेक्समध्ये नाचणाऱ्या होत्या
आणि दारूच्या नशेत, झोपाळलेल्या डोळ्यांनी दहा बारा वाजता होणारी सकाळ होती..
पण मला हवी असलेली रात्र अशी नव्हती.
उलट ती शांत, निपचित होती आणि
आवाज आलाच तर तो फक्त वाऱ्यामुळे सळसळत्या पानांचा..
सकाळ, सकाळसुद्धा एखाद्या वस्त्रावरचा काळ्या रंगाचा पदर
बाजूला केल्यावर दिसणाऱ्या शुभ्र अभ्रासारखी होती.
आज ती रात्र मला मिळाली,
काळी ठिक्कर पडलेली, जणू पांढऱ्या कागदावर सांडलेली काळ्या शाईची दौतच..
झोपण्याचा बराच प्रयत्न केला मी पण तिने पणच केला होता न येण्याचा.
रात्रभर पळणारी झाडं मी पहिली, वाऱ्याशी स्पर्धा करत जाणारी ट्रेन पाहिली,
अंगावर गोधडी घेऊन झोपलेलं गाव पाहिलं.
रात्रीचा प्रत्येक प्रहर पहिला, तिची बदलणारी रूपं पहिली,
पहाट होण्याची चाहूल लागताच पूर्ण उठण्याआधीची अर्धवट झोपेतली रात्रही पहिली,
आणि मग काळा रंग करडा होऊ लागला, सावल्या जमिनीशी बोलू लागल्या,
वाराही सुसाट वेगाने पळू लागला..
अन् एका अनामिक क्षणी रात्रीचा काळा पदर बाजूला सरला आणि पहाट झाली,
मात्र अजूनही नभांचं मळवट सोनेरी किरणांनी भरणं बाकी होतं.
हळूहळू गाव उठू लागलं, पुरेसा प्रकाशही पडला आणि
आकाशात अस्पष्ट अशा छटा दिसू लागल्या,
सूर्याच्या किरणांचा रंगही जणू वेगळाच दिसला,
पांढऱ्या शुभ्र ओढणीवर विस्कटलेला जर्द केशरी रंग....
अर्धवट दिसणारा तो प्रभाकर आता आकाश व्यापू लागला,
संपूर्ण पृथ्वीवर आपल्या प्रकाशाचं अधिराज्य गाजवू लागला,,
सकाळ झाली अगदी मला हवी होती तशीच सकाळ झाली आणि मी भारावून गेले.
परंतु इतक्या रात्रींचं माझं जागणं व्यर्थ नाही ठरलं,
कारण इतके दिवस मला काय नको होतं हे त्या रात्रींनी मला सांगितलं..
आणि अखेर माझी सकाळ झाली, अगदी मला हवी होती तशी,
सकाळ झाली......
कविता संपली पण मी मात्र मनाने पुन्हा त्या ट्रेनच्या डब्ब्यात जाऊन पोचले,
काय छान होती ती रात्र,
स्वतःच्याच मस्तीत रंगलेली आणि रुळांच्या आवाजावर डुलणारी रात्र..
अशी तुमची रात्र तुम्हीही शोधा कारण ती मिळाल्याचा आनंद अविस्मरणीय असतो...

👌kya baat
ReplyDeleteThank you 😊
DeleteSakali wachtoy pan asa watla ratrach hoti ki kay.... awesome
ReplyDeleteHehe thanku so much Abhishek .. 😊
DeleteChhan kavita aahe, and I agree with Abhishek 😁
ReplyDeleteThanku Sanjog 😊
ReplyDeleteThe feel of the poem is wonderful and very picturesque. Lagech dolya samor yeta sagla. Best line,"pandhrya kagdavar sandlelya kalya shaicha dautach..." :)
ReplyDelete😊 thankuu Ashish.. hich feeling dyaychi hoti ki mazhya najretun tumhi ti ratra pahu shakal, anubhavu shakal and it seems that my mission is accomplished 😀
ReplyDeleteyapeksha best ajun kay asu shakat ki ekhdi kavita wachun aplyala swata ekhadi navi kavita suchtey .. khup chan lihites ha tu...
ReplyDeletehe kharach faar chaan asta Harshada... khup lihi aani dhanyawaad :-)
Deleteyapeksha best ajun kay asu shakat ki ekhdi kavita wachun aplyala swata ekhadi navi kavita suchtey .. khup chan lihites ha tu...
ReplyDeleteHi Juee, its really amazing.. Impressive man.!! Keep it up..!
ReplyDeletethanku so much Abhang dada... :-)
DeleteSundar...Tuzi hi kavita vachun mala me punyat ektine anubhavlelya tya ratrichi athvan zali..
ReplyDeleteIts really an awesome experience to feel that silence wen all others are asleep.. :)
yeah panu :-)
Deleteyeah panu :-)
Delete