थोडं हलकं-फुलकं..

T.Y पासून ठरवता ठरवता शेवटी आज ब्लॉग सुरु केला..

खरंतर बरंच काही लिहून ठेवलंय पण पहिली पोस्ट काय असावी ह्यावर बराच विचार केला.
नक्की काय लिहावं? एखादी सुंदरशी कविता? की असंच सुचलेलं काहीतरी जे कोणत्याही पक्क्या ढाच्यात बसत नाही ? मग म्हटलं असू देत आज जरा हलकं-फुलकं लिहू..

आजवरच्या आयुष्यात बरचं काही पाहिलं, खूप शिकून घेतलं , अनेक अनुभव घेतले पण आज वाटलं की व्यक्त व्हावं,
माझ्यापुरती मी होत होते घरच्यांकडे व्यक्त मात्र आज सगळ्यांसमोर व्हावसं वाटलं.
मला जितकं मिळालं तितकं घेत गेले कधी ओंजळ भरून गेली मग तेव्हा मनात साठवत गेले आणि तरीही अतृप्त वाटतंय. का ? कारण मलाही माहित नाही, खूप शब्द होते माझ्या आजूबाजूला, प्रत्येकाने वेगवेगळे वापरलेले, शब्दचशब्द !

शब्द..
काय असतात हे शब्द ?
त्यांना जीव असतो ?
बोलू शकतात ते आपल्याशी ?
रागवतात आपल्यावर ते माणसांसारखे ?
मी म्हणेन हो शब्दांना असतो जीव, ते बोलतात आपल्याशी म्हणूनच कधीतरी आपल्याही नकळत कविता होऊन जाते..
शब्द रागवतात सुद्धा... ते रागवतात आणि  मग कविता अर्धीच राहते मनात..
शब्द जिवंत असतात म्हणूनच जेव्हा कविता सुचते किंवा काही लिहिलं जातं तेव्हा मुलाला जन्म दिल्यावर जसा एखाद्या आईला आनंद होतो तसा आनंद लिहिणाऱ्याला होतो.. कारण सोप्पं आहे, प्रत्येक लेखकाचं लिखाण ही नवनिर्मितीच असते..

ह्या सगळ्यातून माझं विश्व तयार झालं, माझं आणि माझ्या शब्दांचं.. कधीतरी मनातली भावना व्यक्त करताना ते पटकन सापडले तर कधी खूप खोलवर शोध घ्यावा लागला; तेव्हा जाऊन कोपऱ्यात सापडले.
मात्र बऱ्याचदा ते मला नाही सापडले आणि मग कविता अर्धवटचं राहिली मनात....

आजवर मनाच्या कोऱ्या पानावर जे रेखाटलय ते सगळं मांडावसं वाटलं,
 हा प्रयत्न करून पहावासा वाटला माझ्या शब्दांच्या रांजणावरचं झाकण काढून शब्द मोकळे करावेसे वाटले..
आणि म्हणूनच खुलं केलं हे शब्दरांजण

Comments

  1. Jueli. It's an absolutely cute start. Especially "shabda ragawtat ani mhanun ch kavita ardhawat rahte" and "pratyek lekhakacha likhan he navanirmiticha asta." Je lihila ahes te faar khara ahe. Bhasha ani bolnyacha shakti hi mansala milaleli dengi ahe ani tyamule aj apan ithe ahot. Vyakta hona he ek chhan maadhyam ahe jyani apan swatala ankhi janun gheto, aplyala aple vichar clear hotat, apan modify karto ani ya saglya sathi vichar karna faar mahatvacha asta ani karun zalyavar to mandla ki jasta spashta chitra tayar hota... apan kay ahot, kuthe ahot, kase ahot, kasa asawa ani kay karawa yacha... faar uttam prakare tu tujhya shabdana akar dilela ahes. He Raanjan fakta tula distay yacha ananda ahe karan let it be a secret for others karan tyani utsukta rahil raanjanatun kay aj milnar ahe ani tahan bhaagnar ki ankhi tahan lagnar yachi... Keep it up :)

    ReplyDelete
    Replies
    1. आशिष, खूप धन्यवाद इतक्या सुंदर प्रतिसादाबद्दल... :-) हो, आत्माशोधासाठीच हा प्रयत्न आहे... आता एक जबाबदारी वाढलीये पण ती मी स्वीकारलीये आणि त्याची पूर्तता करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.. तुला माझं लिखाण आवडलंय हे जाणून घेऊन फार बरं वाटलं... yes शब्दरांजण is and will be a secret for everyone.. पुन्हा एकदा धन्यवाद.. :-)

      Delete
  2. Kharach Khup chan suruwat keli ahes. Sundar lihlays 👌😊

    ReplyDelete
  3. Loved your start. Waiting for more posts. Keep writing. :)

    ReplyDelete
  4. Nice work juee..keep it up☺

    ReplyDelete
  5. very nice keep it up Sneha Gadgil

    ReplyDelete
  6. Nice start juee...keep it up...waiting for more...nywaz congrates....

    ReplyDelete
  7. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

काळी ठिक्कर...