पावसापलीकडलं काही.....
आजची सकाळ इतकी सुंदर झाली,
डोळे उघडले तर समोर खिडकीत दिसला इवलासा पाऊस,
आणि कानाशी छपरावर पडणाऱ्या थेंबांचा आवाज...
निवारा न मिळाल्याने चिंब भिजून पावसातच बसलेले पक्षी,
आभाळात मात्र पावसाचीच नक्षी..
झाडांच्या पानांवर आकार,उकार नसलेली थेंबवेल,
आणि पानांच्या कडेला, खिडकीच्या गजाला गोठलेले थेंब...
करड्याच रंगाच्या वेगवेगळ्या छटा,
वारा जणू विस्कटत होता पाऊसधारांच्या बटा,
कारण तो पाऊस मध्येच शांत होता,
मध्येच थोड्या वेगात होता,
आणि आता तर एका वेगळ्याच आवेगात आलाय,
दिवसभर कोसळायचा निश्चय करून...
हवेतही गारवा आलाय,
गोधडीची ऊब हवीशी वाटतेय,
जिभेवर कॉफीची चव रेंगाळतेय,
पोटाला भूकेची जाणीव होतेय,
पण डोळे, त्यांना मात्र हलायचं नाहीये,
समोर दिसणारा प्रत्येक थेंब,
त्या थेंबाची प्रत्येक हालचाल,
सततचा पाऊस,
हे, हे सगळं डोळ्यात साठवायचंय...
मनातल्या प्रत्येक शब्दाला कागदावर उतरवायचंय,
त्याच शब्दांना माझ्या भावनांशी भांडायचंय,
आठवणींना माझ्या आयुष्यातला प्रत्येक पाऊस आठवायचाय...
रेनकोटमध्ये शिरून एक गोंडस बाळ दिसायचंय,
हिंदू कॉलनीत साचणाऱ्या पाण्यातून वाट काढायचीये,
छत्री घेऊन दुकान मांडलेल्या काकांकडची कैरी खायचीये,
हातातली छत्री मुद्दाम फिरवत चालायचंय,
फिरणाऱ्या छ्त्रीसोबत प्रत्येक धारेची एकमेकांतली गुंफण पहायचीये,
साडीच्या निऱ्या, एका हाताला मुलाचा हात धरून कसरत करत चालणाऱ्या आयांना पहायचंय,
बस स्टाॅपच्या आडोशाखाली असलेल्या काकांना चिडवायचंय,
रेनकोट असूनही भिजायचंय,
मुद्दाम आज हळूच चालायचंय,
शाळेतला प्रत्येक दिवस आठवयचाय,
आठवणींच्या त्याच हिंदोळ्यावर पुन्हा झुलायचंय....
पुन्हा कावरीबावरी होऊन रुपारेलच्या गेटमध्ये शिरायचंय,
कॉलेजची हिरवळ पाहून पुन्हा प्रेमात पडायचंय,
साचलेल्या पाण्यातून वाट काढत कॅंटिनला जायचंय,
सांबाला मन्चुरिअन राईसची आॅर्डर देऊन वेड्यागत फक्त पाऊस पहायचाय,
गवतामध्ये अनवाणी चालायचंय,
दोन्ही बाजूंनी तांबडी खोडं आणि मधे मोठ्ठा हिरवा पट्टा असलेलं रुपारेलचं अंगण डोळ्यात साठवायचंय,
भर पावसात अर्ध भिजत १० कलाच्या वर्गात पुन्हा पोहोचायचंय,
छत्री सांभाळत, गेटमध्ये शिरत ओळखपत्र घालण्याची कसरत करायचीये,
त्याच वर्गातल्या, त्याच खिडकीतून कोसळणारं आकाश आणि भिजणारं, भरत जाणारं रुपारेल पुन्हा अनुभवायचंय.....
समुद्राच्या सोबतीतला पाऊस झेलायचाय,
क्षितिजाची धूसर रेघ शोधायचीये,
त्याच्या कुशीत शिरून पावसाच्या प्रत्येक थेंब स्पर्श करायचाय,
एकाच छत्रीत अर्ध सुकं, अर्ध भिजलेलं व्हायचंय,
त्याचा हात हातात घेऊन मग वेड्या पावसात भिजायचंंय,
माझ्या ओंजळीत इटुकला पाऊस साठवायचाय,
छोट्याश्या ओंजळीतून गळणारा एकएक थेंब पहायचाय,
त्याच्यासोबत कधीही न घेतलेल्या चहाचा घोट घ्यायचाय,
प्रेमातल्या त्याच दिवसातला पाऊस जगायचाय.....
कर्जतला जुन्या गाण्यांसोबत नव्याने भेटणारा पाऊस पहायचाय,
खिडकीतून हात बाहेर काढत, भिजलेल्या तळहातावर झोंबणाऱ्या वाऱ्याशी हातमिळवणी करायचीये,
धो धो कोसळणाऱ्या पावसात एकटंच भिजणारं माझं घर बघायचंय,
वेगवेगळ्या गवताच्या रंगांत मिसळायचंय,
खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बेडकाचे डोळे शोधायचेत,
पाऊस आल्यावर माझ्या बिलूची होणारी तारांबळ पहायचीये,
ढग गडगडले की भुंकणाऱ्या ब्राऊनीच्या आवाजाला साद घालायचीये,
आजीच्या चेहऱ्यावरचं चैतन्य पहायचंय,
भिजता येणार नाही या जाणीवेने खिन्न झालेला चेहरा लपवायचाय,
या पावसात तिला एकदा तरी भिजवायचंय....
सोनेरी दिवसांच्या झुल्यावर बसून उंच उंच झुलायचंय,
आणि झुलता झुलता पाऊसच व्हायचंय......

Pausach vhaychay... wah! :) (y)
ReplyDelete😊 😊
ReplyDelete