ती...

रात्रीचे शामदान उघडून ती आली,
सुंदर काया दिसायला मात्र नाजूक नवेली...

कमनीय बांध्यावर चोपून नेसलेली पांढरी साडी,
केसांचा आंबाडा जणू सावध हरिणी....

घायाळ करून गेली स्वत:च्या सुगंधाने,
तिच्यासाठी कित्येकदा झुरलेत ते शहारे...

रात्रभर ती लावण्यवती खुलून उमलली,
अलगद झाडांच्या त्या फांद्यांवर मग विसावली..

ती अवतरली जणू एक अप्सरा,
तिच्यासोबत उमलणे म्हणजे जणू योग दुग्धशर्करा...

मोकळ्या रानभर बागडली ती रात्रभर,
इतरांची नजर जाताच लाजली ती सहजसुंदर....

पहाटेच्या दवात न्हाऊन ती निघाली,
ओलेती होऊन अजून खुलून ती आली...

कोसळणारया सरींसोबत चिंब ती न्हाली,
श्रावणसख्यासोबत बेधुंद ती झाली....

सूर्यनारायणाच्या किरणांनी अजूनच बहरली ती फुलराणी,
पाहून तिला म्हणाले लोक," अहाहा ! काय सुंदर ती फुलली रातराणी.. "





Comments

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

दिल से दिल तक..