विसंगत...

ती राधा गोरीगोमटी
तो कृष्ण निळासावळा
ती लाजलाजरी देखणी
तो स्पर्श खुळावणारा,

ती बासरीचे सूर
तो रंगांचा देखावा
ती शब्दांनी नटलेली
तो शब्दांचाच भुकेला,

ती सांज गर्द केशरी
तो शीतल चंद्र पारवा
ती लाट निळी बावरी
तो शांत समुद्रकिनारा,

ती दामिनी जणू लखलखती
तो मंद सांजगारवा
ती अफाट वेडा पाऊस
तो खोल खोल शांतता,

ती अविरत कोसळणारे थेंब
तो संथ वाहता झरा
ती खळखळणारी नदी
तो साचलेला ओढा,

ती नाजूक जुईचं फूल
तो सुवासिक केवडा
ती रानभर पसरलेली वेल
तो सावलीचा आसरा,

ती न कळलेलं आयुष्य
तो विचारांचा साठा
ती प्रश्न अनामिक आणि
तो उत्तरांचा थवा,

ती अखंड प्रेमात बुडालेली
तो प्रेमाचा निवारा
ती त्याचा श्वास पिसारा
तो अर्थ तिच्या असण्याचा....
Add caption

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

काळी ठिक्कर...