प्राजक्त...
तुझ्या ओंजळीतला प्राजक्त कधी बहरलाच नाही.
मी वाट पाहत होते त्याच्या चैतन्याची,
त्याच्या मनमुराद हसण्याची,
लाजत मुरडत डोलण्याची,
पण तसं झालंच नाही .
तुझ्या ओंजळीतला प्राजक्त कधी बहरलाच नाही.
त्याला बहुदा फुलणं आवडत नसावं,
कारण कलाकार माणूस तू
तुझ्याकडे सगळेच फुलतात,
आपली क्षितिजं खुलवतात.
प्राजक्त फुलायला हवा होता,
पण तसं झालंच नाही.
तुझ्या ओंजळीतला प्राजक्त कधी बहरलाच नाही.
मला हवा होता तो बहरलेला प्राजक्त
मनभरून सुगंध घेतला असता मी त्याचा,
माझ्या ओंजळीत घेऊन त्याला स्पर्श केला असता,
पण तसं झालंच नाही.
तुझ्या ओंजळीतला प्राजक्त कधी बहरलाच नाही.
प्राजक्त तसाच राहिला कोषात,
बंदिस्त..
निष्क्रिय...
फक्त तुझ्या ओंजळीच्या सावलीत,
अस्तित्वहीन...
ओळख नसलेला प्राजक्त....
त्याने बहरायला हवं होतं ना ?
फुलायला हवं होतं,
बागडायला हवं होतं,
तुझ्या ओंजळीत नाचायला हवं होतं,
पण तसं झालंच नाही.
तुझ्या ओंजळीने,
तुझ्या ओंजळीने प्राजक्ताला बहरुच दिलं नाही...
का ?

Comments
Post a Comment