त्याला आवडायचं...
ओंजळीत तिच्या केवड्याची फुलं होती,
त्याला केवडा फार आवडायचा.
पावसात ती नखशिखांत भिजत होती,
त्याला पाऊस फार आवडायचा.
दूरवर पसरलेला समुद्र ती न्याहाळत होती,
त्याला समुद्र फार आवडायचा.
विमानांची ये-जा ती पाहत होती,
त्याला विमान फार आवडायचं.
मऊसूत वाळूत ती फिरत होती,
त्याला वाळू फार आवडायची.
पुस्तकांची पानं ती आवडीने वाचत होती,
त्याला पुस्तकं फार आवडायची.
वाफाळत्या कॉफीचा घोट ती घेत होती,
त्याला कॉफी फार आवडायची.
पडत झडत ती सायकल चालवत होती,
त्याला सायकल फार आवडायची.
त्या दोघांसाठी तो जगत होता,
त्याला ती फार आवडायची.
हसायची ती सतत,
त्याला हसणं फार आवडायचं.
तो गेला तरी ती रडली नाही,
त्याला हसणारी ती फार आवडायची !
Perfectly captured emotions. Reminded me of P.S. I Love You.
ReplyDeleteKhup surekh, Jueee!
Thank you so much Ashish 😊
Delete