काजळ...

नाजूकसे डोळे,
थरथरणाऱ्या पापण्या
आणि सुंदरश्या डोळ्यातलं काजळ..

मला विसरताच येत नव्हतं ते,
पांढऱ्या आभाळाच्या पडद्यावर काळ्या ढगांची रेघ,
तसेच वाटत होते त्या काजळाचे मेघ.

इतकं सुरेख दिसत होतं त्या डोळ्यांत ते
की माझी नजर हटेना.

मी असं रोखून थेट तिच्या डोळ्यात पाहणं
तिला विचित्र वाटलं असणार,
तिच्या डोळ्यांनीच सांगितलं मला ते.
मग वाटलं बघू नये असं,
परक्या स्त्रीकडे,
पण पुन्हा नजर तिथेच जाऊन खिळली
त्याच सुंदर काजळावर..

मी शेवटी उठलो,
म्हटलं जाऊन सांगावं तिला की मला ते काजळ आवडलंय.
पावलं वळली तिच्या सिटपाशी,
मनात धाकधूक,
"एक्स्क्यूज मी" मी म्हणालो,
"येस?" नाजूकश्या आवाजात ती म्हणाली
"प्लिज डोन्ट माइंड, पण तुमचं काजळ फार सुरेख आहे, अगदी रेखीव"
"थँक्यू" गोडसं हसली ती
हसून मग मी वळलो,
मनात विचार आला काजळ सुरेख आहेच,
पण खरं सौंदर्य तिच्या डोळ्यांत आहे ..

Comments

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

काळी ठिक्कर...