पाऊससखा....
आज तुला भेटायला यावंसं वाटतंय,
न्हाऊन निघावंसं वाटतंय तुझ्या स्पर्शात,
श्वासांच्या उसळलेल्या समुद्रात,
गंधाच्या उधाणलेल्या वादळात,
आणि अडकावंसं वाटतंय बळकट बाहूंच्या भोवऱ्यात.
पण बांधलंय मला कर्तव्यांनी,
पाऊल अडतंय मनात नसूनही,
म्हणून मी पाठवलाय पाऊस,
भेटायला तुला,
निरोप दिलाय, "फक्त भेट,
भिजवू नकोस."
तो लबाड ऐकेल याची खात्री मात्र नाही.
त्याच्यासोबत सौदामिनीही येईल,
जशी मी येते,
लखलखत,
चंदेरी होऊन.
एक सप्तरंगी इंद्रधनुष्य येईल,
बघ, कदाचित माझं हसू तुला आठवेल.
वाऱ्याचा झोतही येईल,
तुला पिसासारखं हलकं करायला.
झेल त्या प्रेमधारा मनभरून,
तशाच जसं कोसळणाऱ्या मला झेलतोस,
अगदी अलगद,
कोवळ्या पानावरल्या इवल्या रेशीम किड्यागत.
तो पाऊस नं, आहेच मुळी खट्याळ,
भिजवलंच ना तुला चिंब?
माझ्याकडे आला तो नंतर,
रागात मी विचारला जाब त्याला,
तर गालातल्या गालात हसून म्हणाला,
" मला भेटता येत नसतं, बरसतो मी फक्त.
अगदी तुझ्यासारखा.
अविरत,
बेभान,
अविश्रांत,
बरसतो केवळ तिच्यासाठी,
आणि कोसळत असतेस तू वेड्यासारखी,
तुझ्या प्राणसख्यासाठी!"
न्हाऊन निघावंसं वाटतंय तुझ्या स्पर्शात,
श्वासांच्या उसळलेल्या समुद्रात,
गंधाच्या उधाणलेल्या वादळात,
आणि अडकावंसं वाटतंय बळकट बाहूंच्या भोवऱ्यात.
पण बांधलंय मला कर्तव्यांनी,
पाऊल अडतंय मनात नसूनही,
म्हणून मी पाठवलाय पाऊस,
भेटायला तुला,
निरोप दिलाय, "फक्त भेट,
भिजवू नकोस."
तो लबाड ऐकेल याची खात्री मात्र नाही.
त्याच्यासोबत सौदामिनीही येईल,
जशी मी येते,
लखलखत,
चंदेरी होऊन.
एक सप्तरंगी इंद्रधनुष्य येईल,
बघ, कदाचित माझं हसू तुला आठवेल.
वाऱ्याचा झोतही येईल,
तुला पिसासारखं हलकं करायला.
झेल त्या प्रेमधारा मनभरून,
तशाच जसं कोसळणाऱ्या मला झेलतोस,
अगदी अलगद,
कोवळ्या पानावरल्या इवल्या रेशीम किड्यागत.
तो पाऊस नं, आहेच मुळी खट्याळ,
भिजवलंच ना तुला चिंब?
माझ्याकडे आला तो नंतर,
रागात मी विचारला जाब त्याला,
तर गालातल्या गालात हसून म्हणाला,
" मला भेटता येत नसतं, बरसतो मी फक्त.
अगदी तुझ्यासारखा.
अविरत,
बेभान,
अविश्रांत,
बरसतो केवळ तिच्यासाठी,
आणि कोसळत असतेस तू वेड्यासारखी,
तुझ्या प्राणसख्यासाठी!"
Comments
Post a Comment