निनावी..

भीती वाटते लेखणी हातात घ्यायला,
कोऱ्या कागदाने शाईच प्यायली तर?
पांढरा कागद निळा होईल,
कृष्णासारखा !
आणि झिरपेल त्यावर
माझी प्रत्येक भावना,
उघड होईल माझं मन,
आजवर दडवून ठेवलेलं फुलपाखरू.
लोकं वाचतील,
चर्चा होतील,
टीका करतील,
थोरवी गातील माझ्या लेखनाची...
पण नकोय मला हे,
मला बोलायचंय
कुठल्याही मापात न झुकता,
कोणत्याही चष्म्यातून न पाहता.

कागद निळा झाला,
उतरली प्रत्येक भावना,
जखमेला घातलेला टाका उसवला,
आणि उरलं माझं रितेपण !
तितक्यात पाऊस आला,
माझ्या आसवांचा,
कागद भिजू लागला,
शब्द धूसर झाले,
स्वल्पविराम लोपले,
आणि लुप्त झाले पूर्णविराम !
कागद पुन्हा पांढरा झाला,
जुन्या ओळींच्या नकाशासह.
माझं मन पुन्हा सुखावलं,
शाश्वत,
चिरंतन वैगरे सगळं मिथ्या असतं,
सत्य असतो केवळ तो क्षण,
रसरसलेला,
टप्पोरा भरलेला,
माझ्या कोऱ्या कागदासारखा.
लिहित असते मी त्यावर आवडेल त्या शाईने,
कधी जपून ठेवली जातात काही पानं,
तर काहींचा होतो निव्वळ चुरगळा !

Comments

  1. फारच वेगळं आहे हे आणि खूप विरोधाभासी पण. पहिल्यांदा असलेली भीती आणि मग तीच भीती खरी ठरली ठेवा नसलेली भीती, कारण व्यक्त झाले तर अडचण आणि व्यक्त व्हायची तळमळ, हे दोन्ही दिसून आला. पाऊसानी त्या भावनेला सुखावले जणू. द्विधा मनस्थिती कशी असावी तर अशी, आणि अशीच असते. फारच छान पण इतका विरोधाभास आहे यामुळे थोडा आश्चर्य वाटलं. अरे वा! हे पटकन आलं नाही मनातून कारण पहिल्या व्यक्त न होण्यालाच पुढे विस्तारीत केलेलं असेल अशी अपेक्षा मी करत होतो.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद आशिष तुझ्या प्रतिसादाबद्दल! हेच तुला वाटलेलं आश्चर्य माझ्यासाठी महत्वाचं आहे, कारण वाचकाला अपेक्षित लिखाण लेखक करेलच असं नाही. तेव्हा जे जसं सुचतं ते शक्य तितक्या निर्मळ आणि बदलाच्या फार कंगोऱ्यात न आणता वाचकांसमोर आणणं आम्हाला महत्वाचं वाटतं. मीही तेच केलंय आणि विरोधाभास म्हणशील तर हो मी आपलं जगणंच मांडलंय, विरोधाभासाशिवाय जग चालत नाही, काही ठिकाणी हलकासा तर काही ठिकाणी तोच विरोधाभास अगदी टोकाचा असतो. तुझी माफीही मागू इच्छिते मी, अपेक्षा पूर्ण करू शकले नाही. पण अशी नाराजी किंवा अशा प्रतिक्रिया येणं तितकंच स्वाभाविक आहे जितकं स्वाभाविक माझं लेखन!

      Delete
    2. मला विरोधाभास मांडण्याची कल्पना अावडली. त्यमुळे वाचकाची उत्सुकता टिकन रहते असं मला वाटतं.

      Delete
    3. मला विरोधाभास मांडण्याची कल्पना अावडली. त्यमुळे वाचकाची उत्सुकता टिकन रहते असं मला वाटतं.

      Delete
    4. धन्यवाद साधना! हो, पण हे अनावधानाने घडलं माझ्याकडून, आनंद वाटतोय की वाचकांना आवडतंय.

      Delete
    5. धन्यवाद साधना! हो, पण हे अनावधानाने घडलं माझ्याकडून, आनंद वाटतोय की वाचकांना आवडतंय.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

दिल से दिल तक..