निशा..

आज निशेने माळल्या केसांत ताऱ्यांच्या माला,
चंद्र हासे नभाआडूनी पाहुनी त्या रजनीला.
काळ्याभोर साडीवर चांदण्याची नक्षी,
झाडाच्या फांदीवर डोले रात्रीचा दिवसपक्षी.
विखुरले केस तिने मग,
तारे सांडले आभाळी
गर्द काळ्या नभी पसरली
जर्द चांदण्याची काजळी.
इतक्यात कुठूनसा कानी आला पावा,
रजनी केवळ मनात जपे तिच्या मिलिंदमाधवा.
त्या पाव्याच्या मंद सुरांनी मोहिले मन,
इकडे व्याकुळ एक तरुणी तिच्या सख्याविण.
सूर होई आर्त,
पण सखा तिचा धूर्त,
उगाच लटके छेडी तिला,
ठेऊन गालांवर हसू,
ती बिचारी बावरी होई,
डोळा येती अश्रू.
त्या अश्रूंची फुले माळूनी जाई तिचा साजण,
हसरी ती निशा खुलवी मग नभांचे अंगण...

Comments

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

दिल से दिल तक..