मीरा कृष्ण राधेचा...
व्याकूळ मन माझे
शोधी निखळ प्रेमझरा ,
त्या वेड्या नभी बरसे
रिमझिमत्या पाऊसधारा ..
चिंब ढगांतून कुंद हवेतून
येई गंध प्रीतीचा ,
ओलेता होऊन जाई
पदर त्या रातीचा ..
धुंद होऊनी मदमस्त वारा
डोले आनंदात ,
हासत लाजत वाजवी वीणा
मंद दिव्याची वात ..
ऐल तटावर पैल तटावर
चाले खेळ लाटेचा ,
त्यासवे मस्तीत नाचे
निळा कृष्ण राधेचा ..
तया पाहूनी हरखूनी जाई
कृष्णदेखणी राधा ,
कृष्णलीला ही चोरुनी पाहे
वृंदावनीची राधिका ..
कृष्णपटलावर मुरडत नाचे
मोर - लांडोरीची जोडी ,
त्या नृत्यासह हळूच वाढे
गोप -गोपिकांची लाडी ..
त्यांना पाहुनी चिडूनी जाई
कृष्णवेडी राधा,
त्याच कृष्णाला गाभारी नेई
कृष्णभक्त मीरा ..
प्रेमापलीकडल्या तिच्या प्रेमाला
नसे कसला धिक्कार ,
दुःखाच्या सागरीही हासेल
असा हा प्रेमालंकार ..
मनमंदिरात राधेच्या
केवळ तिचा कान्हा ,
या प्रीतीच्या आभूषणी शोभे
रत्नरूपी मीरा ..
अंत असे ना या प्रेमाला
युगायुगांची गोष्ट ,
कलियुगातही आहे
राधा ,मीरा अन् एक
निळासावळा कृष्ण !
शोधी निखळ प्रेमझरा ,
त्या वेड्या नभी बरसे
रिमझिमत्या पाऊसधारा ..
चिंब ढगांतून कुंद हवेतून
येई गंध प्रीतीचा ,
ओलेता होऊन जाई
पदर त्या रातीचा ..
धुंद होऊनी मदमस्त वारा
डोले आनंदात ,
हासत लाजत वाजवी वीणा
मंद दिव्याची वात ..
ऐल तटावर पैल तटावर
चाले खेळ लाटेचा ,
त्यासवे मस्तीत नाचे
निळा कृष्ण राधेचा ..
तया पाहूनी हरखूनी जाई
कृष्णदेखणी राधा ,
कृष्णलीला ही चोरुनी पाहे
वृंदावनीची राधिका ..
कृष्णपटलावर मुरडत नाचे
मोर - लांडोरीची जोडी ,
त्या नृत्यासह हळूच वाढे
गोप -गोपिकांची लाडी ..
त्यांना पाहुनी चिडूनी जाई
कृष्णवेडी राधा,
त्याच कृष्णाला गाभारी नेई
कृष्णभक्त मीरा ..
प्रेमापलीकडल्या तिच्या प्रेमाला
नसे कसला धिक्कार ,
दुःखाच्या सागरीही हासेल
असा हा प्रेमालंकार ..
मनमंदिरात राधेच्या
केवळ तिचा कान्हा ,
या प्रीतीच्या आभूषणी शोभे
रत्नरूपी मीरा ..
अंत असे ना या प्रेमाला
युगायुगांची गोष्ट ,
कलियुगातही आहे
राधा ,मीरा अन् एक
निळासावळा कृष्ण !
Comments
Post a Comment