प्रश्न

बरेच प्रश्न आहेत मनात,
काही उलट,
काही सुलट,
शिरलेत काही काळजात खोलवर,
तर काही उभे ठाकलेत हृदयाच्या वेशीवर.
काही लटकलेत मेंदूच्या नसांना,
काही थांबलेत डोळ्याच्या कडांना.
प्रश्न,
अगणित,
असंख्य.
माझ्या शब्दांपासून,
त्याच्या अस्तित्वापर्यंत,
प्रश्नच प्रश्न..
का लिहिते मी?
का सुचतात शब्द मला?
का होते व्यक्त मी शब्दांतून?
प्रश्न
उत्पत्तीचे,
प्रश्न
शब्दगर्भाचे,
प्रश्न,
प्रश्न,
डोक्याच्या आरपार,
मनाच्या अल्याड,
अन् वास्तवाच्या पल्याड,
प्रश्न,
काही उलट,
काही सुलट !

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

काळी ठिक्कर...