कविता!

सस्पेन्स ?
कॅथार्सिस ?
भीती ?
निगेटिव्हीटी ?
काय आहे माझी कविता ?
माझी अभिव्यक्ती ?
माझं लिखाण ?
माझे विचार ?
काय आहेत ते ?
काय आहेत शब्द माझे ?
निव्वळ अक्षरांची जुळवाजुळव ?
की विचारांची सांगड ?

आज ठरवूनच बसले,
हिशोब मांडायला,
कागद आणि शब्दांचा!
मात्र सगळ्यात जास्त वेळ घेतला
विचारांनी,
आणि न थांबणाऱ्या असंख्य प्रश्नांनी...

बराच वेळ गेला,
रात्रीची मध्यरात्र झाली,
मध्यरात्रीची पहाट होणारच होती,
इतक्यात,
इतक्यात,
उत्तर मिळालं!

उत्तर मिळालं,
माझे शब्द आहेत माझी कविता,
त्यातला अर्थ आहे माझी कविता,
आणि नकारात्मकता,
हो, तीदेखील आहे माझीच कविता!

धारदार आहे माझी लेखणी,
आणि बोचतात माझे शब्द,
चिरल्या जातात मेंदूच्या अगणित नसा,
तरीही तुम्ही जिवंत असता,
काहीसे बधिर कधीतरी,
कधीतरी रोमांचित,
तर कधी प्रेमाच्या लाटेवर स्वार,
कारण शाश्वत आहे माझी कविता!




Comments

  1. तर कधी प्रेमाच्या लाटेवर स्वार... ही ओळ मूळ कल्पनेला धरून वाटत नाही, इतकंच. कारण मग प्रेमच कशाला? इतर भावना आहेतच की. असो. मला आवडली.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, त्या ओळीचं स्पष्टीकरण देणं मला महत्त्वाचं वाटतं इथे, तर , मूळ कल्पना माझ्या कवितेबद्दल आहे, आणि मी प्रेमाबद्दलही लिहिते, (फक्त ते प्रेम उगाच sugar coated नसतं) म्हणून तर कधी प्रेमाच्या लाटेवर स्वार (माझे शब्द) ही ओळ आली तिथे.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

काळी ठिक्कर...