घुसमट !

घुसमट मनाची,
घुसमट शरीराची,
आक्रंदत राहतं ते रात्रभर,
समजवण्यापलीकडलं!


प्रत्येक श्वास कठीण होतो मग,
उगाच जिवंत असल्यासारखा,
शरीर बंड करत असतं,
मनाविरुद्ध युद्ध सुरू असतं,
कोण जिंकणार?
शरीर की मन?
घुसमट,
घुसमट,
निव्वळ घुसमट!


कूस बदलूनही इलाज नाही,
ना पाण्याचे हबकारे मारून,
काय करावं?
शरीर चिंब भिजलेलं,
मन मात्र कोरडं,
निस्तेज!


घुसमट,
रात्रभर!
अन् सकाळ,
नेहमीसारखी कुबट! 

Comments

  1. ही मनोवस्था कधी-ना-कधी सारे अनुभवतात. मोजक्या शब्दांत आपण हे मांडलं आहे. छान!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

दिल से दिल तक..