कॉफीचे थेंब...

सिगरेटचा धूर निघत असल्यासारखा
गरम वाफा येत असलेला कॉफीचा मग,
समोर उघडी लॅपटाॅपची स्क्रीन,
बाहेर आग ओकणारा सूर्य,
काळवंडलेलं टेबल,
डार्क कॉफीच्या नशेत मी!

खट खट खट खट खटखट
खटखटखट खटखटखटखट
बटणांचा आवाज,
टाइपिंगच्या वेगाने प्रणयाच्या धुंदीत असल्यासारखा
डुलणारा लॅपटाॅप...

विचारांचा आणि टाइपिंगचा वेग
जुळवण्याच्या निष्फळ प्रयत्नात मी!
युद्धाची वेळ,
मेंदूची नस अन् नस उत्तेजित!
युद्धाची वेळ,
कोण जिंकणार?
माझे हात?
विचारांचे पाय?
युद्ध,
युद्धद्धद्ध....

मी तह केला,
स्वैर धावणाऱ्या विचारांशी
आणि मस्तीत कीबोर्डची तलवार चालवणाऱ्या बोटांशी!
दोघांनी एकत्रच जायचं,
Not too slow, not too fast,
but hand in hand..

क्षीणल्यासारखी मान टाकली स्क्रीनने,
मी अचेतन अवस्थेत खुर्चीत,
डोळ्यासमोर कवितेचा जन्म,
अन् कॉफी मगच्या कडेवरून
कडेलोट झाल्यासारखे,
ओघळणारे,
कॉफीचे थेंब...

Comments

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

काळी ठिक्कर...