वास्तव !

बोलू मी त्याच्या - तिच्यासारखं ?
चालेल तुला ?
साखरेच्या पाकात बुडवलेल्या कारल्यासारखं ?
चालेल तुला ?

लिहू मी त्याच्या - तिच्यासारखं ?
तेच तेच प्रेम करणं,
त्यावरंच सारखं लिहिणं,
नाहीतर नेहमीचा पाऊस,
चिंब भिजण्याचा अनुभव,
लिहू मी तेच ?
नवीन प्रेमात पडणं ?
पहिलाच स्पर्श ?
लिहू मधाळ सगळं ?

नकोय वास्तव तुला ?
साखरंच हवीये ?
लपवलेलं सत्य हवंय ?
मीसुद्धा तेच लिहिलेलं हवंय ?

नाही !!
मला नाही जमायचं,
लोकांसारखं बोलणं,
सगळ्यांसारखं लिहिणं,
मला वास्तव मांडायचंय,
अस्वस्थता,
तगमग,
लिहिता लिहिता हरवणं,
कधीतरी मूडच न लागणं,
मग चिडचिड,
त्रागा,
ते मांडायचंय,
ते सगळं मांडायचंय..

कारण सगळेच मांडतायंत प्रेम,
सुख,
दु:ख,
सुंदर पडणारा पाऊस,
पण मला मांडायचाय;
चिखल,
कारण तो ही आहे सत्य,
मला तेच लिहायचंय,
सत्य,
परखड पण ढळढळीत,
वास्तव !!!
  

Comments

  1. Nice one....staring lines fab

    ReplyDelete
  2. खरंच... प्रेमाबद्दल इतकं काही लिहिलं जातं, की हल्ली ते वाचायचा कंटाळा येतो... त्याचा आनंद घेणं दूरच. तुमचे इतर ब्लॉग्ज वाचावे असं वाटतंय.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

काळी ठिक्कर...