Posts

ज्ञानसूर्य अस्ताला गेला, पण पुन्हा उगवण्यासाठी...

Image
एकादशीची संध्याकाळ होती, आठ वाजले होते.. पडल्यापडल्या माझा डोळा लागलेला, उठले तर ६४ मेसेज होते, कळेना नक्की झालंय काय.. मेसेज उघडून पाहिला तर धक्काच बसला, आणि माझ्याही नकळत मी रडायला लागले, बातमी होती, " डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम अनंतात विलीन झाले. " डॉ. अब्दुल कलाम, एक अजस्त्र व्यक्तिमत्व, अत्यंत हुशार पण तितकेच साधे, म्हणजे आकाशात भरारी घेत असतानाही जमिनीवर कसं राहावं हे त्यांच्याकडून शिकावं इतका तो माणूस विनयशील होता. स्वतःच्या ज्ञानाचा गर्व नाही, पुरस्कारांचं अप्रूप नाही, जगजाहीर असलेल्या नावाचंही काही नाही, अगदी ऋषितुल्य माणूस, पण प्रेम, श्वास आणि ध्यास एकंच ' भारत देश आणि त्याचा विकास ' त्यांनी लग्न केलं नाही, का ? तर त्यांना फक्त स्वतःच्याच नाही तर भारतातल्या प्रत्येक मुलाला, ज्याला शिक्षण मिळत नाही अशा प्रत्येक मुलाला शिकवायचं होतं, किती निस्वार्थी असावं कलाम सरांनी ! एक सच्चा शिक्षक, कल्पक संशोधक, प्रेमळ माणूस आणि लोकांचा राष्ट्रपती म्हणजे कलाम सर. भारतात असं आहे ना, की तुमची जात आणि धर्म प्रत्येक पावली पाहिला जातो, पण कलाम सर ही पहिली व्यक्त...

अस्वस्थता....

सगळं वातावरण स्तब्ध आहे या क्षणी झाडाचं पानदेखील हलत नाहीये, वाऱ्याचं कुठेही अस्तित्व नाहीये कृत्रिम वारा सोडला तर... एक विश्रांत संध्याकाळ आहे ही दिवेलागणीसाठी तयार असलेली, एका तपस्वी, ध्यानस्थ पुरुषासारखी.. दिवसभराच्या कष्टाने थकलेला जीव, कोसळणाऱ्या पावसामुळे जड झालेले ढग, सतत एकमेकांना साद घालून दमलेले पक्षी, भिजलेले वृक्ष, आणि थेंबांचा मारा सहन करून कंटाळलेले दगड, सगळं, अगदी सगळं वातावरण क्षिणलयं... पण मी, मी मात्र या वातावरणात शब्दांशी भांडतेय, मनातल्या सगळ्या भावना कागदावर उतरवण्यासाठी धडपडतेय.. मिळाले आहेत का शब्द मला? कदाचित हो, कदाचित नाही.. पण हेच म्हणायचयं का मला? माहित नाही.. कधी कळेल, काय म्हणायचयं? काय मांडायचयं मला? ठाऊक नाही.. मांडू शकेनही, पण त्यासाठी वातावरण, मन सगळचं सर्जनाच्या अधीन झालेलं हवं, तरच नवनिर्मिती होईल, शब्दांच्या या जाळ्यातून एक सुंदरशी वीण तयार होईल.. एकसंध नसली तरीही जोडलेली असेल, या ना त्या धाग्याने.. तसं पहायला गेलं तर एलसंध काहीच नसतं, आपणच शोधत असतो सगळ्यात संगती.. या रचनेत ना शेवट असेल ना सुरुवात, पण एखादा धा...

आज वाटलं पाऊसंच व्हावं.....

पावसाकडे पाहता पाहता आज वाटलं पाऊसंच व्हावं... टप्पोरे थेंब बनून अलगद बरसावं, झाडांच्या मुळाशी हळूच थांबावं, नाजूक सदाफुलीवर रेलावं, पानांवरून मोत्यांच्या माळेसारखं पडावं.. जमलेल्या सगळ्या लहानग्यांना चिंब भिजवावं, त्या दोघांच्या प्रेमळ प्रेमाची साक्ष व्हावं, कागदाच्या होड्यांना हलकेच ओलं करावं, ढगांना साद घालावी, इंद्रधनुष्याला जन्म द्यावा, वाऱ्याशी हितगुज करावं, आणि गारव्याशी भांडावं... कधी श्रावणसर म्हणून बरसावं, तर कधी वळीवाचा पाऊस म्हणून, नाहीतर पडू की नको अशा द्विधा मनस्थितीत असावं, कधीतरी कोणालाही जाणवणार नाही असं रिपरिप यावं, कधी सोसाट्याचा वारा, गारांइतके थेंब घेऊन गरजावं, मात्र कधी संध्यामग्न पुरुषासारखं शांतपणे यावं... नवकवींना लिहिण्यासाठी शब्द द्यावे, विरहाला कंटाळलेल्या तिला सुख द्यावं, आणि प्रत्येकाला जपण्यासाठी एक तरी आठवण द्यावी....

For you Gypsy.....

Image
Sometimes people walk into your life unexpectedly,they walk with you, talk with you, make you feel special, they make you cry, and at the end they are the ones who make you laugh... In a very short period of time they know you in and out, it becomes a bond of ages... You can tell any damn thing to them, they are like your backbone and without them you won't be able to walk properly, but still they make you strong... They come into your life to make it more beautiful, they paint your already colorful life with mixture of their own colors.. They become inseparable part of your life and heart, they become your world, you take their advice in every crazy, stupid thing, you just can't imagine your life without them..... You are that special for me, no one can see the future but stay as you are, no matter where we will be and what we would be doing, but stay in touch because as I say, ' you are a Gypsy ' and i don't want to lose you.... You are a ...

नातं...

Image
आईच्या गर्भात असल्यापासूनच आपल्यासमोर नात्यांची ही मोठ्ठाली रांग असते, आई, बाबा, आजी, आजोबा, खूप सारी नाती, बरेच नातेवाईक, आईच्या माहेरचे, बाबांच्या बाजूचे, प्रचंड लोकं... काही नाती ही रक्ताची असतात, तर काही आपण आपल्या आवडीने निवडतो.. पण हे नातं म्हणजे नेमकं काय? म्हणजे माणूस हा समाजात राहणारा घटक आहे, असं आपण सगळेच लहानपणापासूनच ऐकतोय, वाचतोय, आणि समाज म्हटला की लोक आले, लोक आले की मग आपले आणि परके किंवा अनोळखी, असा फरकही आलाच.. याचसोबत आलं नातं... नातं सांभाळता नाही आलं तर काचेला जसा तडा जातो, तसा नात्यालाही मग तडा जातो, कधीतरी छोट्याश्या वादाने, विनाकारण केलेल्या गैरसमजाने नात्याची काच फुटते. जर आपण काहीही विणायला बसलो, तर कधीतरी अचानक लोकर गुंतते, आणि मग बराच प्रयत्न करून ती सोडवावी लागते.. नात्याचं पण असंच असतं, ते कधीतरी न सुटण्याइतकं गुंततं, तर कधी नेमका एक दोरा ओढला की गुंता सुटतो, मात्र बऱ्याचदा असंही होतं की, नात्याचे दोर कापून आपल्याला हवे तेच नीट जपून ठेवावे लागतात.. नातं माणसा-माणसाला जोडतं आणि तोडतंसुद्धा, एकच नातं कधी जगायला भाग पाडतं, तर...

सर्वसामान्य...

जवळ जवळ दोन वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी नेहमीप्रमाणे कॉलेजवरून येत होते, खरंतर गर्दीची वेळ नव्हती पण 'दादर स्टेशन' म्हटलं की तिथे कधीही गर्दी असतेच, आणि नेमकं ,माझं दादरला काम होतं.. काम झालं, मी ट्रेनची वाट पाहत उभी होते आणि समोरच मला बाकड्यावर बसायचं सोडून खाली रस्त्यावर बसलेली एक बाई दिसली, हो, बाईच ना ? रस्त्यावर बसलेली 'स्त्री', असं सामान्य माणसं बोलत नाहीत, होय ना? स्त्री म्हणजे पुस्तकात, आत्मचरित्रात किंवा कवितेत शोभणारा शब्द आहे.. पण ती स्त्री कितीही मोठी असली, तरी शेवटी पुरूष जेव्हा तिच्याकडे पाहतो आणि त्याची नजर जेव्हा 'अरे, ही सुंदर आहे' म्हणून असणाऱ्या कौतुकाच्या पुढे जाते तेव्हा ती नजर बोचते, आणि इतकी लागते की त्यापेक्षा सहन केलेला शारीरिक छळ परवडेल.. तर, ती बाई, मग उठून उभी राहिली, तिची भिरभिरणारी नजर , ती काहीतरी शोधत होती, घाबरली होती ती, पण कशाला ? काय माहित, कदाचित तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता ... तिला बघून सुचलेली ही कविता, गर्दीच्या चेहऱ्यातून ती मला दिसली, भेदरलेल्या नजरेने पाहत होती ती लोकांना, जगालेखी एक...

Bookbee...

Image
Books, Books are honey and like honeybees are attracted to honey, I am attracted to books... Hehehe, my new coinage for that is BOOKBEE, you know   like honeybee... Book is like oxygen for me, you can live without anything but oxygen. Exactly the case with me, the relationships which are a part of my life are truly just a part, but books are my life.. I want a big house where there will be books and books everywhere. There are particular things which show that you are a true bookbee.. When mom gives you your pocket money, and the first thing you do is calculate the money to buy books, then you are a true bookbee.. Being a girl, rather than spending money on eyeliner and kajal, when your priority list starts from books, then you are a true bookbee.. When your friends are talking about alcohol, and you think, " okay, in 750 rs I will buy 4 books than buying alcohol. " then you are a true bookbee.. When there are exhibitions and book fairs, you go and...