Posts

नातं...

Image
आईच्या गर्भात असल्यापासूनच आपल्यासमोर नात्यांची ही मोठ्ठाली रांग असते, आई, बाबा, आजी, आजोबा, खूप सारी नाती, बरेच नातेवाईक, आईच्या माहेरचे, बाबांच्या बाजूचे, प्रचंड लोकं... काही नाती ही रक्ताची असतात, तर काही आपण आपल्या आवडीने निवडतो.. पण हे नातं म्हणजे नेमकं काय? म्हणजे माणूस हा समाजात राहणारा घटक आहे, असं आपण सगळेच लहानपणापासूनच ऐकतोय, वाचतोय, आणि समाज म्हटला की लोक आले, लोक आले की मग आपले आणि परके किंवा अनोळखी, असा फरकही आलाच.. याचसोबत आलं नातं... नातं सांभाळता नाही आलं तर काचेला जसा तडा जातो, तसा नात्यालाही मग तडा जातो, कधीतरी छोट्याश्या वादाने, विनाकारण केलेल्या गैरसमजाने नात्याची काच फुटते. जर आपण काहीही विणायला बसलो, तर कधीतरी अचानक लोकर गुंतते, आणि मग बराच प्रयत्न करून ती सोडवावी लागते.. नात्याचं पण असंच असतं, ते कधीतरी न सुटण्याइतकं गुंततं, तर कधी नेमका एक दोरा ओढला की गुंता सुटतो, मात्र बऱ्याचदा असंही होतं की, नात्याचे दोर कापून आपल्याला हवे तेच नीट जपून ठेवावे लागतात.. नातं माणसा-माणसाला जोडतं आणि तोडतंसुद्धा, एकच नातं कधी जगायला भाग पाडतं, तर...

सर्वसामान्य...

जवळ जवळ दोन वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी नेहमीप्रमाणे कॉलेजवरून येत होते, खरंतर गर्दीची वेळ नव्हती पण 'दादर स्टेशन' म्हटलं की तिथे कधीही गर्दी असतेच, आणि नेमकं ,माझं दादरला काम होतं.. काम झालं, मी ट्रेनची वाट पाहत उभी होते आणि समोरच मला बाकड्यावर बसायचं सोडून खाली रस्त्यावर बसलेली एक बाई दिसली, हो, बाईच ना ? रस्त्यावर बसलेली 'स्त्री', असं सामान्य माणसं बोलत नाहीत, होय ना? स्त्री म्हणजे पुस्तकात, आत्मचरित्रात किंवा कवितेत शोभणारा शब्द आहे.. पण ती स्त्री कितीही मोठी असली, तरी शेवटी पुरूष जेव्हा तिच्याकडे पाहतो आणि त्याची नजर जेव्हा 'अरे, ही सुंदर आहे' म्हणून असणाऱ्या कौतुकाच्या पुढे जाते तेव्हा ती नजर बोचते, आणि इतकी लागते की त्यापेक्षा सहन केलेला शारीरिक छळ परवडेल.. तर, ती बाई, मग उठून उभी राहिली, तिची भिरभिरणारी नजर , ती काहीतरी शोधत होती, घाबरली होती ती, पण कशाला ? काय माहित, कदाचित तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता ... तिला बघून सुचलेली ही कविता, गर्दीच्या चेहऱ्यातून ती मला दिसली, भेदरलेल्या नजरेने पाहत होती ती लोकांना, जगालेखी एक...

Bookbee...

Image
Books, Books are honey and like honeybees are attracted to honey, I am attracted to books... Hehehe, my new coinage for that is BOOKBEE, you know   like honeybee... Book is like oxygen for me, you can live without anything but oxygen. Exactly the case with me, the relationships which are a part of my life are truly just a part, but books are my life.. I want a big house where there will be books and books everywhere. There are particular things which show that you are a true bookbee.. When mom gives you your pocket money, and the first thing you do is calculate the money to buy books, then you are a true bookbee.. Being a girl, rather than spending money on eyeliner and kajal, when your priority list starts from books, then you are a true bookbee.. When your friends are talking about alcohol, and you think, " okay, in 750 rs I will buy 4 books than buying alcohol. " then you are a true bookbee.. When there are exhibitions and book fairs, you go and...

ती...

Image
रात्रीचे शामदान उघडून ती आली, सुंदर काया दिसायला मात्र नाजूक नवेली... कमनीय बांध्यावर चोपून नेसलेली पांढरी साडी, केसांचा आंबाडा जणू सावध हरिणी.... घायाळ करून गेली स्वत:च्या सुगंधाने, तिच्यासाठी कित्येकदा झुरलेत ते शहारे... रात्रभर ती लावण्यवती खुलून उमलली, अलगद झाडांच्या त्या फांद्यांवर मग विसावली.. ती अवतरली जणू एक अप्सरा, तिच्यासोबत उमलणे म्हणजे जणू योग दुग्धशर्करा... मोकळ्या रानभर बागडली ती रात्रभर, इतरांची नजर जाताच लाजली ती सहजसुंदर.... पहाटेच्या दवात न्हाऊन ती निघाली, ओलेती होऊन अजून खुलून ती आली... कोसळणारया सरींसोबत चिंब ती न्हाली, श्रावणसख्यासोबत बेधुंद ती झाली.... सूर्यनारायणाच्या किरणांनी अजूनच बहरली ती फुलराणी, पाहून तिला म्हणाले लोक," अहाहा ! काय सुंदर ती फुलली रातराणी.. "

पावसापलीकडलं काही.....

Image
आजची सकाळ इतकी सुंदर झाली, डोळे उघडले तर समोर खिडकीत दिसला इवलासा पाऊस, आणि कानाशी छपरावर पडणाऱ्या थेंबांचा आवाज... निवारा न मिळाल्याने चिंब भिजून पावसातच बसलेले पक्षी, आभाळात मात्र पावसाचीच नक्षी.. झाडांच्या पानांवर आकार,उकार नसलेली थेंबवेल, आणि पानांच्या कडेला, खिडकीच्या गजाला गोठलेले थेंब... करड्याच रंगाच्या वेगवेगळ्या छटा, वारा जणू विस्कटत होता पाऊसधारांच्या बटा, कारण तो पाऊस मध्येच शांत होता, मध्येच थोड्या वेगात होता, आणि आता तर एका वेगळ्याच आवेगात आलाय, दिवसभर कोसळायचा निश्चय करून... हवेतही गारवा आलाय, गोधडीची ऊब हवीशी वाटतेय, जिभेवर कॉफीची चव रेंगाळतेय, पोटाला भूकेची जाणीव होतेय, पण डोळे, त्यांना मात्र हलायचं नाहीये, समोर दिसणारा प्रत्येक थेंब, त्या थेंबाची प्रत्येक हालचाल, सततचा पाऊस, हे, हे सगळं डोळ्यात साठवायचंय... मनातल्या प्रत्येक शब्दाला कागदावर उतरवायचंय, त्याच शब्दांना माझ्या भावनांशी भांडायचंय, आठवणींना माझ्या आयुष्यातला प्रत्येक पाऊस आठवायचाय... रेनकोटमध्ये शिरून एक गोंडस बाळ दिसायचंय, हिंदू कॉलनीत साचणाऱ्या पाण्यातून वाट काढायचीये, छत्री...

पहिला दिवस...

Image
पहिला दिवस हा सगळ्यात महत्वाचा, मग तो शाळेचा असो, प्रेमाचा असो, लग्नानंतरचा असो, कुठलाही असो त्याची उत्सुकता ही सारखीच असते... पण शाळेचा पहिला दिवस काही औरच असतो, या दिवशी काहीजण शाळेत जायचं नसतं म्हणून रडतात, मात्र नंतर, शाळेत पुन्हा जाणं शक्य नाही या भावनेने आपण सगळेच रडतो.. तर अशाच या  पहिल्या दिवसाचे हे दोन अनुभव.... पहिला दिवस, शाळेची चढलेली पहिली पायरी.. आत्तापर्यंत होती गुंफण, पण अचानक सुटलेला आईचा हात, सगळ्या मुलांबरोबर मला पुढे पाठवण्याची बाईंची गडबड, आणि आईची मात्र अश्रू लपवण्याची धडपड... भांबावलेल्या चेहऱ्याने पाहिलेला वर्ग, रडवेल्या छोट्या पऱ्यांचा तो जणू स्वर्ग. प्रत्येकाची आईला पाहण्याची तळमळ, डोळ्यांमधून मात्र अश्रूंची पळापळ.. स्पीकरवर लागलेली प्रार्थना, गुरूंना केलेली वंदना, न कळणारे शब्द, पण बाईंना कळलेल्या भावना... कविता म्हणण्याचा त्यांचा प्रयत्न, अजूनही काहींच्या डोळ्यात आसवांची रत्न, हळूहळू थांबलेलं रडू, शेपटीवाल्या प्राण्यांनी आणलेलं हसू, इवलासा युनिफॉर्म, केसांची दोन नारळाची झाडं, नाजूकसे बूट, युनिफॉर्मच्या कोपऱ्यात लावलेल...

It's all about caring and sharing...

Image
Y esterday I was talking with a friend of mine and it was a general discussion about things.. but all of a sudden the mysterious topic of  " LOVE " came in.. He asked me what is love ? I took a minute's pause and replied love is friendship, but now I think love is much more than friendship, because we have so many friends but we love only one person...                               So, what is LOVE ? The most discussed topic in literature and films. I think love begins with friendship, You start talking to each other, then the time span increases from two minutes to two hours and you just don't notice that, you start looking for cheaper mobile plans. Even the chats increase. You start liking each picture of him, you follow each of his update. You try to gift him the best gift, may that be a perfume, a watch or just a poem which is written only for him.. But you know what?  these things are...