Posts

शब्दांपलीकडचं बरंच काही !

मनातले विचार आज कागदावर उतरत नाहीयेत, घाबरतायत ते, खूप घाबरतायत.. आज का असं होतंय कुणास ठाऊक, झालंच नव्हतं असं कधी, नवीनच काहीतरी घडतंय... का घाबरताय बाळांनो? या ना बाहेर, कोणी रोखणार नाही तुम्हाला, बंधन घालणार नाही तुमच्या स्वातंत्र्याला, मी खात्री देते, . . . विश्वास नाहीये ? खरंच देते मी खात्री, या बाहेर निर्धास्त... का त्रास देताय? मी अस्वस्थ झालेय, बाहेर नाही पडलात तर वेडीपिशी होईन, प्लीज या, तुम्हाला आवडतंय ना? हे असं वागायला? इतर वेळी अल्लड मुली घोळक्यात येऊन, पुढे पुढे करत मी येऊ ? मी येऊ? म्हणतात तसे असता, कधीतरी निर्लज्जपणे येताही बाहेर, मग आज का पाऊल अडलेल्या बाईसारखे वागताय? अरे, माझे शब्द कसे स्वच्छंद आहेत, मनमुराद बागडणारे, ऐटीत मिरवणारे... नाहीच येणार का? काय झालंय इतकं? या ना आता खरंच, त्रास होतोय, दिवस पुढे गेलेल्या गरोदर बाईसारखं वाटतंय अगदी.. का पडत नाही आहात बाहेर? का? ठीक आहे, नकाच येऊत. रहा आत घुसमटत, मी आहे मज्जेत, मोकळा श्वास घेतेय, सुखाने जगतेय, पण आज काहीतरी वेगळं घडणार, नक्कीच घडणार, आज बहुदा होईल मग, शब्...

भीती..

मला भीती वाटते रे, रात्र झाली की काळोखाचे राक्षस, अंधाराच्या सावल्या मला खायला उठतात. घर रिकामं असतं माझं, अगदी मोकळं. मग वाटतं खुर्च्या चालतायत, भांडी एकमेकांशी भांडतायत आणि खिडक्या आदळतायत गजांवर. मी दडून बसते मग, चादरीच्या आत, तितकचं समाधान आधाराचं ! आज तू येशील? बरं वाटतं मला तू असलास की, येशील ? तू असलास की बळ येतं मला दहा हत्तींचं, मी जणू शिवरायांचा मावळा होते तेव्हा, तू पण खुश होतोस मग, म्हणतोस, माझं पिल्लू किती ते निडर ! पण, पण, ऐक ना, पिल्लू घाबरतं रे, खूप घाबरतं, सावल्यांच्या खेळाला, भासांच्या अंधाराला. पिपहोलमधून बघितलं की डोळा दिसतो, एकच, पण तो प्रेमाने बघत असतो माझ्याकडे, मग कळतं डोळा तुझाच आहे, "माझी पिल्लू, दार उघड माऊ" म्हणणारा. मी दार उघडते, तू आत येतोस, दार धाड्कन बंद होतं, मी त्या आवाजाला घाबरून तुला घट्ट मिठी मारते, "तू आजची रात्र थांब, जायचं नाही कुठे!" मी तुला सक्त ताकीद देते. तू गायला लागतोस, " आज जानेकी जिद ना करो" ते शब्द गात असतात फरीदा खानुम, पण ते असतात माझ्याच मनातले. तू राहतोस...

मोहिनी ..

प्रेमात पडलंय तुझं हृदय ? मनात फक्त तीच आहे ? मग एक कर, उधळून टाक आयुष्य, चौफेर दौडू देत तुझ्या प्रेमाचे वारू, मस्त स्वार हो आनंदाच्या लाटेवर.. सोबत तिलाही घे, प्रेमात पडलंय तिचंही हृदय ? मग तर रंगून जा एकमेकांच्या मिठीत, आणि पसरू देत तुमच्या शरीराचे सुवास, तुझ्या मनात, तिच्या डोळ्यांत... प्रत्येक उसासा, क्षिणलेला प्रत्येक उच्छवास, तिच्या मानेवर तू दिलेला हलकासा चुंबनझरा, आणि त्याच क्षणी तिच्या नजरेतली लाली, गालावर चढलेला लाजेचा रंग, सगळं टिपून घे तुझ्या डोळ्यांत.... तिचं नाजूक नाक, राग आल्यावर हळूच थोडं मोठं होणारं. तुला न आवडणारे तिचे डोळे, खोल तरीही शांत. तिचं झऱ्यासारखं निखळ हसू, तुझ्या डोळ्यांत दिसतंय तुझं प्रेम.. तिचा राग समजून घे, त्याची सुंदरशी फुलमाळ बनव, तिच्याच केसांत माळ. नभागत भासणाऱ्या तिच्या कपाळावर हलकेच तुझे ओठ टेकव. सुरेखशी लाजेल मग ती भुईकडे पाहत, प्रेमात पडलास ना ह्याच लाजण्यावर? त्याच झुकलेल्या नजरेवर, तिच्या थरथरणाऱ्या पापण्यांवर, वेड लावलंय ना तिने? आणि मग "मोहिनी" हलकेच नाव घे तिचं, बघ, अगदी खुश होईल बापडी.. प्...

काजळ...

नाजूकसे डोळे, थरथरणाऱ्या पापण्या आणि सुंदरश्या डोळ्यातलं काजळ.. मला विसरताच येत नव्हतं ते, पांढऱ्या आभाळाच्या पडद्यावर काळ्या ढगांची रेघ, तसेच वाटत होते त्या काजळाचे मेघ. इतकं सुरेख दिसत होतं त्या डोळ्यांत ते की माझी नजर हटेना. मी असं रोखून थेट तिच्या डोळ्यात पाहणं तिला विचित्र वाटलं असणार, तिच्या डोळ्यांनीच सांगितलं मला ते. मग वाटलं बघू नये असं, परक्या स्त्रीकडे, पण पुन्हा नजर तिथेच जाऊन खिळली त्याच सुंदर काजळावर.. मी शेवटी उठलो, म्हटलं जाऊन सांगावं तिला की मला ते काजळ आवडलंय. पावलं वळली तिच्या सिटपाशी, मनात धाकधूक, "एक्स्क्यूज मी" मी म्हणालो, "येस?" नाजूकश्या आवाजात ती म्हणाली "प्लिज डोन्ट माइंड, पण तुमचं काजळ फार सुरेख आहे, अगदी रेखीव" "थँक्यू" गोडसं हसली ती हसून मग मी वळलो, मनात विचार आला काजळ सुरेख आहेच, पण खरं सौंदर्य तिच्या डोळ्यांत आहे ..

त्या तिघी...

                 आज सकाळी ९.३० च्या सुमारास रेल्वेने प्रवास करत होते, बाहेर हलकासा पाऊस पडत होता. स्त्रियांच्या डब्यात अगदी गर्दीही नव्हती आणि डबा पूर्ण रिकामाही नव्हता. ऑफिसला जाणाऱ्या बायका, मुली, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली आणि कानातल्यासारख्या तत्सम वस्तू विकणारे काही विक्रेते असे सगळे ह्या डब्यात प्रवास करत होते.                  मी मस्त लोखंडी बंदिस्त खिडकीतून बाहेरचं विस्तीर्ण, ढगाळ आभाळ पाहत होते. पहिलं स्थानक येऊन गेलं आणि माझ्या समोरच्या दाराजवळच्या मोकळ्या जागी एक साध्याश्या लाल साडीतली एक स्त्री मोठ्याने हसत येऊन उभी राहिली. तिच्याच मागून निळ्या साडीतली दुसरी स्त्री अशीच हसत आली, त्या निळ्या साडीतल्या स्त्रीने लाल साडीवाल्या स्त्रीला हसत हसत कानात काहीतरी सांगितलं आणि दोघीही मोठमोठ्याने हसू लागल्या. या दोन्ही स्त्रिया आधीच म्हटल्याप्रमाणे साध्याश्या साडीत होत्या, दोघींच्या खांद्याला पर्सही होत्या पण थोड्या हलक्या प्रत...

भास..

तो लिहायचा, जे सुचेल, जे पटेल, जे रुचेल, ते सगळं तो लिहायचा.. लेखक होता तो! लोकांना आवडायचं त्याचं लिखाण, काहींना कळायचं नाही. "कसं सुचतं रे तुला ?" "थोड्याच दिवसात पुस्तक येणार वाटतं" इथवर लोकं बोलायचे. मात्र तो खूष नव्हता, त्याला भीती वाटायची, त्याच्या कल्पनांची, विचारांची, त्याच्या शब्दांची, शब्दांशी गुंफणाऱ्या ओळींची, आणि लिखाणाची. हो, एका लेखकाला भीती वाटत होती, लिहायची.. पण त्यामागे कारण होतं. त्याने रेखाटलेल्या व्यक्तिरेखा, शब्दबद्ध केलेली प्रत्येक व्यक्ती, त्याला रोज रात्री भेटू लागली. त्याच्याकडे आपल्या व्यथांच्या कथा मांडू लागली, आणि तो बिथरू लागला. भास कोणता आणि सत्य काय हेही त्याला कळेना, "हे खरं नाहीये रे, कथा-कवितांमधली पात्रं कधी खरी होतात का वेड्या ? भ्रम आहे हा! " तो स्वतःला समजवायचा. रात्र झाली की खेळ सुरु व्हायचा, व्यक्तिरेखांचा, शब्दांचा, संवादांचा, अस्तित्वाचा.. याच उद्वेगात त्याने कविता लिहिली, बरेच पुरस्कार मिळाले त्याला.. मात्र अजूनही खेळ संपला नव्हता, आता या खेळात तोसुद्धा सामी...

"प्लीज, मला मदत कराल ?"

मी स्वतःलाच गोळा करत चाललोय, चिंधड्या-चिंधड्यांतून, तुकड्या-तुकड्यांतून, आणि तळागाळातून.... आधी मी पूर्ण होतो, दोन हात, दोन पाय, एक हृदय, टकलावर चार केस, मी पूर्ण होतो... मध्येच रस्त्यावर एक मुलगी दिसली, हात नसलेली. तिला हात दिले. एका पुरुषाला, माझे पाय... माझ्याही नकळत मी सगळं देत गेलो, जीवावर उदार होऊन. मी तर हृदयही दिलं, एक-दोनदा नाही तर पाच वेळा, त्याचेही आता तुकडे झालेत, प्रत्येकीने वेगवेगळ्या आकारात, वेगवेगळ्या हत्याराने ते तोडलंय.. काही भाग तर चक्क हरवलेत कुठल्यातरी खोल डोहात, काळ्यामिट्ट अंधारात. कुठेही शोधून सापडेनासे झालेत  माझे अवयव.. "प्लीज, मला मदत कराल ? एकच मदत कराल?" "मी जशी सगळ्यांना मदत करत गेलो, माझे अवयव देत गेलो, तसं तुम्ही कराल?" "शरीरात रक्तही नसलेल्या या कफल्लकाला पूर्णत्व द्याल ?" "मला गरज आहे हो त्या पूर्णत्वाची, खूप गरज आहे, प्लीज मला मदत कराल?" "काही नाही तर फक्त माझं पिळवटलं गेलेलं हृदय, पिचलं गेलेलं मन, प्लीज ते तरी एकत्र करून द्याल? हवं तर शिवून द्या, मला ना, ...